पीडब्ल्यूडीत कामे न करता मिळतात चाचणी अहवाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पीडब्ल्यूडीत कामे न करता मिळतात चाचणी अहवाल

Share This

मुंबई - सरकारी कामांचे खोटे चाचणी अहवाल सादर करून कोट्यवधी रुपयांची बनावट कामे दाखविल्या प्रकरणी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) 22 अभियंत्यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित केले. पण तरीही अशा गैरप्रकारांवर वचक बसला नसल्याचे समोर आले आहे. "काम केलेले नसतानाही त्या कामाचे चाचणी अहवाल बनविण्याचा प्रकार बेलापूर येथील एस. के. जी. या प्रयोगशाळेने केला आहे. धक्कादायक म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील सेवकांसाठी असलेली इमारत आणि पीडब्ल्यूडीचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या दालनातील ही कामे दाखविल्याचा पर्दाफाश आरपीआयचे (आठवले गट) कार्याध्यक्ष कांतिकुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत केला. 

प्रयोगशाळेने दिलेले बोगस रिपोर्ट या वेळी जैन यांनी जाहीर केले. दोन वर्षांपूर्वी बेलापूर येथे एस. के. जी. प्रोजेक्‍ट ऍण्ड इंजिनिअर कंपनीची बांधकाम साहित्याची गुणवत्ता चाचणी करणारी प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेला पीडब्ल्यूडीच्या मुंबई विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी परवानगी दिली होती. याच प्रयोगशाळेत कागदपत्रांची खातरजमा न करता केवळ व्हॉट्‌सअपवर पत्र पाठविल्यानंतर मटेरियलच्या नमुन्यांचा गुणवत्ता चाचणी अहवाल दिला जातो, असा दावा जैन यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages