विसरू नका, डाव्यांच्या हातात आहे नक्षलवाद - आंबेडकरांचा सनातनला दम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2015

विसरू नका, डाव्यांच्या हातात आहे नक्षलवाद - आंबेडकरांचा सनातनला दम

सांगली - 25 sep 2015 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार सनातन संघटनेला पटत नसल्याने सनातन विचारातून त्यांची हत्या करण्यात आली. सनातनचे आदेश असल्याने पानसरे यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे सनातन संस्थेच्या सर्व प्रमुखांना अटक करून त्यांची चौकशी केली पाहिजे, असे मत रिपब्लिकन (आंबेडकर गट) नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे व्यक्त केले.

आंबेडकर म्हणाले की, सनातन मासिकातून जे आदेश साधकांना दिले त्यातूनच पानसरे यांची हत्या झाली. मारामारीची भाषा करणाऱ्या सनातनने डाव्यांच्या हातात नक्षलवाद आहे हे लक्षात ठेवावे. हिंदूनी सनातन संस्थेला देणगी देणे बंद करावे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या सर्व प्रमुखांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पानसरे यांची हत्या सनातनच्या आदेशावरुन झाल्याचा आरोप करत मारामारीची भाषा करणाऱ्या सनातनने डाव्यांच्या हातात नक्षलवाद आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा सनातनला दिला आहे. त्याचबरोबर देशातील हिंदूनी सनातन संस्थेला देणगी देणे बंद करावे, असे आव्हान आंबेडकर यांनी केले आहे. ते आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

समीर गायकवाड याचा पानसरे यांच्याशी वैयक्तिक वाद नव्हता. तर सनातन संस्थेला पानसरे यांचे विचार पटत नसल्याने त्यांनी सनातन मासिकातून आपल्या साधकांना हत्येचे आदेश दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की या हत्येचा मूळ उद्देश शोधायचा असेल तर पोलिसांनी सर्व सनातन प्रमुखांना अटक करून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सनातने मारामारीची भाषा करू नये. डाव्या चळवळीच्या हातात नक्षलवाद आहे हे लक्षात ठेवावे, असा इशारा सनातन संस्थेला दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS