ज्यांनी देशाला सक्षम संविधान दिले , त्यांच्यासाठी पंतप्रधानांना तासभर वेळ देता येऊ नये हे दुर्दैव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2015

ज्यांनी देशाला सक्षम संविधान दिले , त्यांच्यासाठी पंतप्रधानांना तासभर वेळ देता येऊ नये हे दुर्दैव

मुंबई : २५ सप्टेंबर
ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सक्षम असे संविधान दिले, त्यांच्या स्मारकाच्या भुमिपुजनासाठी जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना तासभर वेळ मिळू नये ही बाब खुपच दुर्दैवी आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणे ही आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या तमाम भारतीयांची अस्मिता आहे. त्यामुळे वारंवार भुमिपुजनाचा मुहूर्त पुढे ढकलून पंतप्रधान या आंबेडकरी अस्मितेचा अपमान करत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.


येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भुमिपुजन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल, अशी घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली होती. मात्र आता कोणतेही समर्पक कारण न देता हे भुमिपुजन पुढे ढकलण्यात आले असून आता ते ११ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने दिली जात आहे. या अगोदरही १४ एप्रिल २०१५ रोजी अशाच पद्धतीने भुमिपुजनाचा कार्यक्रम पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा घटनाक्रम मन विषण्ण करणारा असून खरोखरच हे सरकार आंबेडकरी विचारधारा मानते की नाही, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नसल्याची खंत मा. अहिर यांनी व्यक्त केली. एकिकडे सनातनी विचारांची भलामण केली जात असतानाच सर्वसमावेशक आंबेडकरी विचार मात्र दुर्लक्षिला जात असून देशभरातील आंबेडकरी जनतेला आधार आणि विश्वास देण्यात हे सरकार पुर्णत: अपयशी ठरल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

सचिन अहिर पुढे म्हणाले की, लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेली वास्तु विकत घेण्याबाबत आज जरी राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेत असले तरी त्या व्यवहारातही राज्य सरकारने दिरंगाई करत चालढकल केली होती. मात्र आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे सरकारला हा व्यवहार पुर्ण करावा लागल्याची आठवण करून देत यावेळीही आंबेडकरी जनतेने अशीच एकजूट दाखवून सरकारला लवकरात लवकर इंदू मिलच्या जागेवर भुमिपुजन करण्यास भाग पाडावे, असे आवाहनही अहिर यांनी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages