कोंबडीच्या अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी पालिकेची तीन दक्षता पथके - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2015

कोंबडीच्या अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी पालिकेची तीन दक्षता पथके

मुंबई : 25 Sep 2015
कोंबडीच्या अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या बाजार विभागामार्फत तीन दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. शहर, पश्‍चिम आणि पूर्व उपनगरांत ही पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.

या तीन दक्षता पथकांमार्फत कोंबडीच्या अनधिकृत दुकानांवर मुंबई पालिकेच्या अधिनियमानुसार नियमित कारवाई केली जाते आणि कारवाईत पकडलेल्या कोंबड्यांचा पालिकेच्या मंडईत लिलाव करण्यात येतो व लिलावातून वसूल झालेली रक्कम पालिकेच्या तिजोरीत नियमित जमा करण्यात येते. बाजार विभागामार्फत मुंबई शहरात एकूण १५५ व्यावसायिकांना कोंबडी कापणे आणि विकण्याचे परवाने दिले आहेत. मंडईतील परवाना मिळालेल्या व्यावसायिकांना कचरा उचलणे, पाणीपुरवठा, पॅसेज लाईट अशा सुविधा दिल्या जातात, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. त्यांना दिलेल्या उत्तरात ही माहिती प्रशासनाने दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages