घाटकोपर पश्‍चिमेचा स्कायवॉक मेट्रोला जोडणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर पश्‍चिमेचा स्कायवॉक मेट्रोला जोडणार

Share This
मुंबई : घाटकोपर स्थानकाच्या पश्‍चिमेला असणार्‍या स्कायवॉकला मेट्रो स्टेशनशी जोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मध्य रेल्वेच्या १२ मीटर रुंदीच्या सध्याच्या रेल्वेच्या पादचारी पुलावर होणारी कोंडी त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
घाटकोपर पश्‍चिमेला असलेल्या स्कायवॉकला मेट्रो स्टेशन इमारतीस जोडण्याची योजना आहे. या पुलाचे ड्रॉईंग एमएमआरडीएने गेल्या वर्षी मध्य रेल्वेला पाठवले होते. त्यामध्ये ३0 एप्रिल २0१५ रोजी रेल्वेने दोन दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या दुरुस्त केलेल्या ड्रॉईंगना १0 मे २0१५ रोजी रेल्वेने मंजुरी दिल्याने आता लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर गोवंडी स्थानकाजवळ एम पूर्व वॉर्ड परिसरात अंकुर सिनेमाजवळ २ कोटी २३ लाख रुपयांचा पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव २0१३ मध्ये रेल्वेला देण्यात आला होता. मध्य रेल्वेने ३१ ऑगस्ट २0१५ रोजी नवे डिझाइन पाठवले आहे. तसेच गोवंडी स्थानकाजवळील कुमुद विद्यालयापासून टाटा नगरपर्यंत एम पूर्व वॉर्डातच आणखी एक २ कोटी ४९ लाख ९७ हजार २९0 रुपयांचा पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. तसेच मानखुर्द स्थानकावर ३ कोटी ११ लाख रुपयांच्या पादचारी पुलाचा प्रस्ताव असून पालिकेकडून मात्र या कामास अद्यापि प्रतिसाद मिळालेला नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages