बोगस दर्जा प्रमाणपत्र देउन कोटयवधी रूपयांची बिलं उचलली,
२२ इंजिनिअर्स निलंबित, १९ ठेकेदार काळया यादीत !
सरकारची धडक कारवाई,अन्य विभागाचीही चौकशी होणार
मुंबई,दि.१ (प्रतिनिधी) बांधकामात वापरण्यात येणा-या साहित्याच्या दर्जाबाबत बोगस प्रमाणपत्र सादर करून कोटयवधींची बिलं उचलून शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण मुंबईत उघडकीस आले आहे.या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह तब्बल २२ अभियंत्यांना निलंबित करून या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकरणी १९ कंत्राटदारांनाही काळया यादीत टाकण्यात आले आहे. उत्तर मुंबई विभागातील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्य विभागातील देयकांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असून यातून आणखी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबईतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंधेरी विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कामामध्ये अधिकारी व कंत्राटदारांनी कोटयवधी रूपयांची बिलं उचलल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
एखाद्या कामाचे कंत्राट दिल्यानंतर त्या कामासाठी वापरण्यात येणा-या बांधकाम साहित्याच्या दर्जाची तपासणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येते.अंधेरी विभागात अशी कोणतीही चाचणी न करता बोगस प्रमाणपत्र जोडून कोटयवधी रूपयांची बिलं उचलण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये नागपुर येथील महालेखापाल कार्यालयाकडून उत्तर मुंबई कार्यालयातील या देयकांबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. या देयकांची फेरतपासणी करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी दक्षता व गुणनियंत्रण मंडळाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार चौकशी केली असता अंधेरी विभागाअंतर्गत कंत्राटदार व अधिका-यांनी दुस-या विभागाच्या बनावट चाचणी पावत्या बिलाबरोबर सादर करून शासनाकडून कोटयवधी रूपयांची देयकं वसूल केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणी कंत्राटदारांनी सादर केलेले बनावट चाचणी अहवाल देयकासोबात सादर करणारे अभियंते डी.एम.कुरेशी, एच.के.पाटील, एस.डी,केदारे, एस.बी.भागवत, ए.बी.थोरात, एस.एस.जाधव, एम.डी.देशपांडे. एम.व्ही.मांजरेकर, एस.जी.जाधव व ए.आर.घडले तसेच या काळात उत्तर मुंबईच्या अंधेरी विभागाचा कार्यभार सांभाळणारे कार्यकारी अभियंता के.पी.पाटील,सी.बी.पाटील,उपकार्
या प्रकरणात बोगस दक्षता प्रमाणपत्र सादर करून देयक उचलणा-या १९ कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये सययद सिद्दीकी नासिर अली,किरण चंद्रकांत हाडवळे,काजी मोहम्मद रेहाना, गितांजली मजूर सहकारी संस्था,प्रभात मजूर सहकारी संस्था,अभिनव मजूर सहकारी संस्था आदी १९ कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे.त्यांच्या विरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कसा झाला घोटाळा?
एखाद्या कामाचे कंत्राट दिल्यानंतर त्या कामासाठी वापरण्यात येणा-या बांधकाम साहित्याचा दर्जा चांगला आहे किंवा नाही याची तपासणी करणे बंधनकारक आहे.त्यासाठी या साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात.त्याची तीन प्रतीत पावती देण्यात येते.येरवडा येथील शासकीय मुद्रणालयात छापण्यात येणा-या या पावत्यांवर विशिष्ट क्रमांक असतात.अंधेरी विभागाअंतर्गत झालेल्या कामांची देयके उचलताना सादर केलेल्या पावत्यांवर दक्षता व गुणनियंत्रण विभागाचा लोगो नव्हता.त्यामुळे या कागदपत्रांबद्दल संशय निर्माण झाला.याची चौकशी केली असता या पावत्या तुर्भे येथील कार्यालयातून दिल्याच गेलेल्या नसल्याचे उघडकीस आले.त्यामुळे याची खोलात जाउन चौकशी केली असता हा घोटाळा उघडकीस आला.हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अन्य विभागातील देयकांचीही तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून इतर ठिकाणचे घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.