ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्व लाइनचे काम लवकरच सुरू होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्व लाइनचे काम लवकरच सुरू होणार

Share This
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्व लाइनचे क ाम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या रखडलेल्या प्रकल्पाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्राधान्य दिले असून ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान प्लॅटफॉर्म, सबवे आणि पादचारी पुलाचे क ाम येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) या प्रकल्पासाठी आवश्यक बांधकामासाठी २७ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. हे काम येत्या डिसेंबर २0१७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २८७ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचे सुमारे ६0 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या १५ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गावरील फक्त ९.८ किलोमीटर मार्गाचे काम तेथील अतिक्रमणामुळे शिल्लक राहिल्याची माहिती एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंब्रा येथील पादचारी पुलाचे कामदेखील अंतिम टप्यात आहे. येथील सुमारे १00 झोपड्यांचे पुनर्वसन शिल्लक राहिल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे; परंतु एमएमआरडीएने एमआरव्हीसीला या कुटुंबाचे पुनर्वसन लवकरच करण्यात येईल, असे सांगितल्याची माहितीदेखील या अधिकार्‍याने दिली. या ५-६ रेल्वे लाइनमुळे उपनगरी आणि लांब पल्याच्या गाड्यांचा मार्ग वेगवेगळा होणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages