अल्पसंख्यांक समाजात फूट पाडत आहे भाजप - शमशेर खान पठाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अल्पसंख्यांक समाजात फूट पाडत आहे भाजप - शमशेर खान पठाण

Share This
मुंबई / 8सप्टेंबर 2015 / रशिद इनामदारदेशातील अल्पसंख्याक समाजाची मौलाना आजाद राष्ट्रीय कौशल्य  अकादमी (मानस)च्या नावावर भाजप सरकार फसवणुक करत आहे.मुस्लिमांव्यतिरीक्त इतर अल्पसंख्याक जनतेकडे पुरते दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. अल्पसंख्याकासाठी मानसद्वारे सुरू असलेली स्किल योजना हे ताजं उदाहरण आहे.या संकल्पनेची मुहूर्तमेढ मौलाना अबुल कलाम आजाद यानी रोवली होती.ज्याचा फायदा  देशातील अल्पसंख्यक समुदायाला  मुख्य धारेत सामील होण्यासाठी होईल असा त्यांचा दृष्टिकोन होता. या योजनेला कांग्रेस सत्तेत असतानादेखील कायम ठेवले गेले होते.


भाजपा सरकार अल्पसंख्याक मतांची आपली  वोट बैंक बनवन्यासाठी प्रयत्नशील आहे हेच यातून दिसून येत आहे.मानस योजनेची घोषणा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी दिल्लीच्या लालकिल्यावरून  केली होती.प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी १४ जुलै २०१५ पासून सुरू झाली.मुंबईतील अल्पसख्याकांना  कौशल प्रशिक्षण देण्याचे कंत्राट एम टी एडुकेयर ( महेश टूटोरियल ) या खाजगी शिक्षण संस्थेला देण्यात आले आहे.गंमतीची बाब अशी आहे की, मानस च्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाचा विकास व्हावा हा हेतू आहे.अल्पसंख्यांक समुदायामध्ये मुस्लिम, शिख, ख्रिस्ती, बौद्ध आणि जैन हे समाज येतात. परंतु आजवर फक्त या योजनेत फक्त मुस्लिम समाजातील युवकांनाच प्राधान्य दिले जात आहे.इतर अल्पसंख्याक धर्मांना याबद्दल साधी विचारणा ही केली गेलेली नाही .एम टी एडुकेयर संस्थेला शिलाई, कॉम्प्यूटर आणि ब्युटीशियन  हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या संस्थेत पंचतारांकीत पद्धतीने शिक्षण दिले जाते.परंतु मोठा आर्थिक नफा लक्षात घेऊन  महेश टूटोरियल प्राइवेट लिमिटेड  शिलाई, कम्प्यूटर आणि ब्यूटीशियन सारखे प्रशिक्षण देऊ लागली.मानस च्या  प्रशिक्षकाना नाममात्र वेतन दिले जात आहे.प्रत्यक्षात मात्र भारत सरकारकडून मोठा मोबदला संस्थेला मिळत आहे.

सर्वात आश्चर्यजनक बाब अशी आहे की , मानस द्वारा फक्त २१ दिवसात प्रशिक्षण देऊन शिक्षित तसेच अशिक्षित युवकांना नोकरी योग्य बनवण्याचा दावा केला  जात आहे.दुसरीकडे याच मुद्द्यावर  अवामी विकास पक्षाचे  संस्थापक अध्यक्ष समशेर खान पठान यांचे म्हणणे आहे की, भाजपा मुस्लमानांसह  देशातील इतर  अल्पसंख्यांक जनतेची दिशाभुल करत आहे.ते पुढे म्हणाले,  २१ दिवसाचं प्रशिक्षण फक्त देखावा आहे .इतक्या दिवसामध्ये लोक प्रशिक्षण केंद्रापर्यंत येणारा  रस्ता लक्षात ठेऊ शकत असतील.मानस चा दावा अगदी फोल व फसवणारा आहे. असे मत पठान यांनी व्यक्त केले आहे.अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्याचा कसलाही अनुभव नसताना मुंबई च्या  या प्रसिद्ध खाजगी शिक्षण  संस्थेला ही जबाबदारी सोपवण्यामागे काय गौडबंगाल आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महेश टुटोरियल चे संचालक मेहताब यांच्याशी संपर्क केला असता . संपर्क होऊ शकला नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages