रेल्वे स्थानकांच्या परिसरात अनधिकृत पार्किंग करून जाणार्‍यांच्या गाड्यांमधील हवा गुल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2015

रेल्वे स्थानकांच्या परिसरात अनधिकृत पार्किंग करून जाणार्‍यांच्या गाड्यांमधील हवा गुल

मुंबई : रेल्वे स्थानकांच्या परिसरात गाडी अनधिकृतपणे पार्किंग करून जाणार्‍यांना अद्दल घडवली जात आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकांच्या परिसरात पार्किंग करून जाणार्‍यांच्या गाड्यांमधील हवा काढण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे १00 वाहनचालकांच्या गाडीच्या चाकातील हवा काढण्यात आली आहे.
 
परेच्या विरारपर्यंतच्या मार्गावर विविध रेल्वे स्थानकांच्या परिसरात अनधिकृतपणे पार्किंग केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अशा वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट २0१५ पर्यंत अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या ४ हजार ३८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. २0१४ या वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.

रेल्वे स्थानकांच्या परिसरात पे अँण्ड पार्किंगच्या व्यतिरिक्त इतरत्र गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होता. अशा वाहनांवर आरपीएफने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, भाईंदर, विरार अशा काही प्रमुख स्थानकांच्या परिसरात या मोहिमेची तीव्रता वाढवण्यात आल्याचे परेचे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद विजय झा यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages