मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक विलंबाने माहिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक विलंबाने माहिती

Share This
परळी वै दि 01 दुष्काळा सारख्या महत्वाच्या विषयावर मा.मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात दौरा असतांना प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक लोकप्रतिनीधींना विलंबाने माहिती देण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाने होरपळणार्‍या बीडसह संपुर्ण मराठवाड्याला कर्जमाफीसह महत्वाचे निर्णय घेवुन तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दि.02 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा तीन दिवसांपुर्वी ठरला असतांना प्रशासनाकडुन मात्र विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींना आज मंगळवारी सायंकाळी 06.30 वाजता माहिती आणि बैठकीबद्दल सांगण्यात आले. जिल्ह्याच्या दुष्काळाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्याना या वेळी महत्वाच्या सुचना मागण्या करता आल्या असत्या, मात्र आपला पुर्वनियोजित दौरा असतांना आणि प्रशासनाने जाणीवपुर्वक माहिती विलंबाने दिल्याने उपस्थित रहाता येत नसल्याचे ना.धनंजय मुंडे यांनी सांगताना उशीरा माहिती दिल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची आपण यापुर्वी दोन वेळा पहाणी केली आहे. उपाययोजना करण्या संदर्भात मा.मुख्यमंत्र्यांना शरदचंद्र पवार साहेब यांच्या समवेत भेटुन उपाययोजना सुचवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेवुन या दौर्‍यात याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी करतांना संपुर्ण कर्जमाफी, शासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू करणे, कर्ज वसुली स्थगीती, विजबील वसुली स्थगीती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करणे, स्थलांतर रोखरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची कामे हाती घेणे, सर्व शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजना लागु करणे, दुष्काळी जिल्हे तातडीने जाहीर करणे, पाणी टंचाईसाठीच्या उपाययोजना कराव्यात  सर्वाधिक आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त बीडजिल्ह्यासाठी विशेष पॅकेज द्यावे आश्या मागण्याही त्यांनी केल्या आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages