Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापौरांमुळे शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पुढे ढकलला


मुंबई / प्रतिनिधी / १ सप्टेंबर २०१५
मुंबई महानगर पालिकेच्या शालेय शिक्षण विभागात काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या महापौर पुरस्कार वितरणाच्या दिवशी महापौर मुंबई मध्ये उपस्थित नसल्याने महापौर पुरस्काराचा कार्यक्रम पुढे ढकलून १२ सप्टेंबरला देण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी पत्रकारांना दिली. अखिल भारतीय साहित्य समेलन अंदमान आणि निकोबार येथे होत आहे या साहित्य संमेलनाला मुंबई महानगर पालिकेने २५ लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश महापौर स्वता घेवून जाणार असल्याने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. 

मुंबई महानगर पालिकेने ५० शिक्षकांना महापौर देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्येही शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी बदल करून आपल्या अधिकारात बांद्रा पेटीट इंग्रजी माध्यमाच्या राजेश्री रमेश क्षीरसागर व भारत नगर उर्दू शाळा क्रमांक १ मधील मुकेश दत्ताराम देशमाने या आणखी दोन शिक्षकाना पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. पालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी कमी होत असले तरी मराठी शाळांमधील शिक्षकांना दिले जाणारे १५ पुरस्कार कमी करणार नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना एकाच शिक्षकाला पुरस्कार दिला जातो. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाना पुरस्कार देण्यासाठी तसेच विशेष शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी लवकरच एक प्रस्ताव सादर करणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. 

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom