मुंबई (प्रतिनिधी): 23 Sep 2015
नालेसफाई कामात सध्या केवळ नऊ कंत्राटदारांची चौकशी झाली असून संपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतर याबाबत बोलता येईल. मात्र चौकशी सुरु असताना आणि कार्यवाही सुरु असताना कोणाला पाठीशी घालणे योग्य नसल्याचे सांगत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
नालेसफाई चौकशीत नाल्यातील गाळ वाहताना चुकीची पद्धत वापरून फसवणूक करणारे दोषी कसे नाही असा सवाल करीत आयुक्तांच्या चौकशीचे शिवसेनेकडून अभिनंदन केले असल्याने राहुल शेवाळे आणि पालिकेतील शिवसेना नेत्यांमध्ये केले असल्याने राहुल शेवाळे आणि पालिकेतील शिवसेना नेत्यांमध्ये दुमत असल्याचे लक्षात येते असा टोला कोटक यांनी लगावला. मात्र भ्रष्टाचाराचे समर्थन भाजपा किवा शिवेसेनाही करणार नाही असे सांगत त्यांना शिवसेनेला चुचकरण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, भाजपने केलेल्या आरोपामुळेच नालेसफाईची चौकशी झाली असून त्यामुळे कंत्राटदरांचे इतर अधिदान रोखण्यात आल्याचे सांगत त्यामुळे घोटला केवळ १६ कोटींचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
