कॉ. पानसरे हत्या प्रकरण - संशयीत समीर गायकवाडला २६ सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2015

कॉ. पानसरे हत्या प्रकरण - संशयीत समीर गायकवाडला २६ सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी


कोल्हापूर  | 23 Sep 2015
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला सनातन संस्थेचा संशयित साधक समीर गायकवाड याला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अ.कु.जैनापुरे यांच्या समोर हजर करण्यात आले.समीर गायकवाड याला न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.न्यायालयाच्या आवारात  प्रचंड गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.समीरला चोख बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते.


२३ सप्टेबर पर्यंत देण्यात आलेली पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने गायकवाडला आज पुन्हा दुपारी ३ वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले. गायकवाडच्या वकिलांनी समीर हा मोबाईल दुरुस्त करणारा व्यक्ती आहे.पानसरे,दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात त्याला जाणीवपूर्वक गोवण्यात येत आहे.तो पूर्णतः निर्दोष असल्याचे म्हणणे मांडून मोबाईल कॉल डिटेल्स,फॉरेन्सीक लॅब या सारख्या बाबींच्या तपासासाठी संशयितांची गरज नसल्याचे सांगून समीर गायकवाड याला न्यायालयीन कोठडी देण्याची वारंवार मागणी केली.

पोलिसांच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी गुन्ह्यातील समीर याच्या  सहभागाविषयी चौकशी करायची असल्याचे सांगून शस्त्रे जप्त करायची आहेत, मोटारसायकल जप्त करायची, तसचे गायकवाडकडे अधिक चौकशी करायची असल्याचे सांगितले. तर समीर आणि त्याची मैत्रीण ज्योती कांबळे यांच्या संभाषणातुन पानसरे हत्येचा उलगडा झाल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी न्यायालयात समीर गायकवाडच्या फोन कॉलचे ट्रान्सक्रीप्शन सादर केलं पोलीस तपासात रुद्रगौडा पाटील याच्याशी समीरचे संबंध असल्याचे उघड. झाल्याचे ही यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले, त्याचबरोबर अंजली या समीरच्या बहीणीशी झालेल्या संभाषणातुनही पोलीसांना पुरावे निष्पन्न झाले असून समीर कडून जप्त करण्यात आलेल्या ३१ मोबाईल सीम कार्डचा तपास करायचा आहे.त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणीही यावेळी सरकारी वकिलांनी केली.

दरम्यान समीर पोलिसांशी तपासात सहकार्य करत नाही.समीरच्या चौकशी वेळी बचावपक्षाच्या वकिलांना उपस्थित राहण्याची मुभा असल्याने तपासात अडथळे येत असल्याचे सुद्धा यावेळी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच समीरच्या आवाजाचे नमुने मुंबईतील फोरेन्सीक लॅबला पाठवले असता त्यांचा रिपोर्ट डीसेप्टीव्ह आल्याचे आणि गुजरातच्या लॅबचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी असल्याने समीरला अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मिळण्याची आवश्यकता असल्याचे वकिलांनी सांगितले.मडगांव बॉम्बस्फोटातील सूत्रधार रुद्रगौडा आणि समीर गेल्या अनेक महिन्यापासुन संपर्कात असल्याचा तपास पथकाचा दावा असल्याने रुद्रगौडा चा शोध पोलीस घेत आहेत.समीर कडून अद्याप माहिती घेण्याचे आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना सात दिवसाचा अवधी आवश्यक असून त्याला सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील बुधले यांनी केली होती. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून न्यायालयाने समीर गायकवाड याला २६ सष्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

सनातन च्या वकिलांची समीरच्या बचावासाठी फौज
कोल्हापुर बार असोसिएशनने समीर गायकवाडचे वकीलपत्र न घेता त्याच्यावर बहिष्कार टाकल्याने सनातन संस्थेकडून बाहेरच्या शहरांमधुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, सांगली येथून जवळपास ३१ वकिलांची फौज न्यायालयात हजर होती.या सर्व वकिलांनी समीरच्या वकीलपत्रावर सह्या केल्या होत्या. न्यायालय सनातनच्या वकिलांनी भरून गेले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages