आता मास्टर माइंड पकडा - मुक्ता दाभोळकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आता मास्टर माइंड पकडा - मुक्ता दाभोळकर

Share This
सातारा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खूनप्रकरणी सनातनशी संबंधित असलेल्या एका संशयितास तपास यंत्रणेने पकडले आहे. ही बाब मनाला उभारी देणारी आहे. आता या पाठीमागचा मास्टर माइंड शोधणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणातील सनातनशी संबंधित असलेला समीर गायकवाड यास पोलिसांनी संशयित म्हणून फोन कॉल डिटेल्सवरून पकडले. हा संशयित सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीस अटक केली जाते, ही नक्कीच मनाला उभारी देणारी गोष्ट आहे. गेल्या काही महिन्यांत मनाला उभारी देणार्‍या गोष्टी घडत नव्हत्या. तपास यंत्रणेने आता खरे म्हणजे या संशयित आरोपीच्या मागे व हल्ल्याच्या मागे कोण आहे? त्याचा मास्टर माइंड कोण आहे? हे शोधणे गरजेचे आहे आणि लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता दाभोळकर यांनी दिली.

खरे सूत्रधार, प्रत्यक्ष मारेकर्‍यांना त्वरित अटक व्हावीकॉ. पानसरे यांच्या खूनप्रकरणी सांगली येथून एका संशयिताला अटक झाली, ही तपासाच्या दृष्टीने निश्‍चितच सकारात्मक बाब आहे. त्याचप्रमाणे, डॉ. दाभोलकर आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येशी याचा संबंध नाही ना, याची कसून चौकशी करण्याची गरज आहे. यावरच तपास न थांबता हत्येमागील खरे सूत्रधार आणि प्रत्यक्ष मारेकरी यांचीदेखील त्वरित अटक व्हावी, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीला अटक केली आहे, सर्वांनीच पोलिसांच्या भूमिकेवर विश्‍वास ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर राज्याच्या तपास यंत्रणेवरच अविश्‍वास दाखविण्यासारखे होईल. त्याचप्रमाणे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अक्षम्य अशी दिरंगाई झाली आहे. संशयितांची साधी चौकशीदेखील झाली नाही, ही शरमेची बाब आहे.
डॉ. हमीद दाभोलकर, राज्य सरचिटणीस, अंनिस. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages