संविधाना प्रमाणे सरकारने धर्मनिरपेक्ष असणे गरजेचे
मुंबई ( प्रतिनिधी ) - मिरा-भाईंदर पाठोपाठ मुंबईतही पर्युषण काळात आठ दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या भाजपच्या मागणीवर सामान्य नागरीकां बरोबरच राजकीय पक्षांकडून तिव्र पडसाद उमटू लागले आहेत.लोकांनी काय खावे हे भाजप ठरवणार काय असा संतप्त सवाल राजकीय पक्षांनी विचारला आहे.मटन खाणाऱ्या लाखो लोकांमध्ये पचंड संतापाची लाट उसळली आहे पालिका आयुक्त यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
जैन धर्मियांचा पर्युषण काळ 10 ते 28 सप्टेंबर दरम्यान सुरु होणार आहे.त्यातील त्याच्या पाठोपाठ आता मुंबईतही 11 ते 17 सप्टेंबर या आठ दिवसात मास विक्री बंद करण्याची मागणी विश्वमैत्री ट्रस्ट अहिंसा संघ ने पालिका आयुक्तांकडे केली होती.त्याला भाजपने पाठींबा दिला असून तसा प्रस्ताव महासभेत मांडण्याची तयारी केली आहे.ही बातमी आज सकाळ मध्ये प्रसिध्द होताच त्यावरुन तिव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या या शाकाहारी मागणीला विरोध केला आहे.त्याच बरोबर ई-सकाळच्या वाचकांमधूनही तिव्र संताप उमटू लागला आहे सप्टेंबर महिन्यात देवनार कत्तलखाना आणि मास विक्री चार दिवस बंद राहाणार आहे.यात श्रावण वद्य 12 दिनांक 10,पालिका ठरावा नुसार 13 , शासनाच्या परीपत्रकानुसार गणेशचतुर्थीसाठी 17 आणि पालिकेच्या ठरावानुसार संवत्सरी निमीत्त 18 सप्टेंबर रोजी बंदी राहाणार आहे.
कॉंग्रेसने ही मागणी घटनाबाह्या ठरवली आहे. संविधाना प्रमाणे सरकारने धर्मनिरपेक्ष असणे गरजेचे आहे.मात्र, भाजप याला तिरांजली देत आहे.मुंबई ही बहुधार्मिक आणि बहुभाषिक शहर आहे.तेथे अशी मागणी करणेच हाच खुळचट प्रकार असल्याचा टोला पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी लगावला.तर,एकाच समाजासाठी धोरणं राबविणाऱ्या भारतीय जनता पक्ष हे नाव योग्य नसुन ते भारतीय जैन पक्ष करावे असा हल्ला मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी जढवला.तर,लोकांनी काय खावे हे भाजप ठरवणार का अशा शब्दात समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी संताप व्यक्त केला. नुकसान भरपाई भाजप देणार का सवाल करत जैन समाजाच्या पर्युषणासाठी आठ दिवस मटणावर बंदी घालण्याची मागणी अत्यंत चुकीची आहे. मीरा भाईंदरमध्ये असा निर्णय घेण्यात आला तो अत्यंत दुर्दैवी आहे. धार्मिक भावनांचा आदर म्हणून कत्तलखाने दोन दिवस बंद करने ढिक आहे मात्र एवढे दिवस बंद करणे चुकीचे आहे या दिवसाचे कोट्यावधी रुपयांचे होणारे नुकसान भाजपा देणार का अशी तिकट प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहे
