लोकसंखेच्या घनतेनुसार मुंबईत पाणी पुरवठा क़रा - आमदार योगेश सागर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसंखेच्या घनतेनुसार मुंबईत पाणी पुरवठा क़रा - आमदार योगेश सागर

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव / 23 Sep 2015
मुंबईमधे असमान पाणी वाटप होते हे असमान पाणी वाटप त्वरीत थांबवून लोकसंखेच्या घनतेनुसार पाणी वाटप करावे, तसेच मुंबईच्या पश्चिम उपनगराला पाणी कपातीमधून वगलावे अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी पत्रकार परिषदेत केली.


मुंबईची 1 कोटी 25 लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी शहर विभागात 31 लाख 42 हजार लोकसंख्या आहे. त्याना दरदिवशी 1160 ते 1175 दशलक्ष लिटर पाणीपुरठा केला जातो. पूर्व उपनगर मधे 36 ते 38 लाख लोकसंख्या आहे. त्याना 1130 ते 1150 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. तर पश्चिम उपनगरात 55 लाख लोक राहतात त्यापैकी 31 लाख 22 हजार लोक फ़क्त गोरेगाव ते दहिसर दरम्यान राहतात. त्याना 730 ते 745 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.

मुंबई शहर व पूर्व उपनगराच्या तुलनेत 25 टक्के लोक पश्चिम उपनगरात राहतात. पश्चिम उपनगराला 25 टक्के पाणी मिलायला हवे परंतू त्याना एकुण पाणी पुरवठ्याच्या फ़क्त 17 ते 18 टक्के पाणी पुरवठा केला जातो. आधीच पाणीपुरवठा कमी होत असताना 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुले पश्चिम उपनगरावर अन्याय होत असल्याने मुंबईमधे लोकसंखेच्या आधारावर पाणी वाटप करावे अशी मागणी योगेश सागर यानी आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईमधील पाणी चोरी आणि पाणी गळती पकडली जावी म्हणून प्रत्तेक घराघरात मिटर लावला जावा. घराघरात मिटर लावल्यास पाणी चोरी थांबेल. पाणी किती आणि कुठे चोरी होते हे समजू शकते असे योगेश सागर यांनी सांगितले. पाणी वाट्पात असमतोल असून हां असमतोलपणा खुद्द आयूक्तानी लक्ष देवून बंद करावा आणि लोकसंखेच्या घनतेनुसार पाणी पुरवठा करावा अशी मागणी सागर यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages