पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2015

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन

न्यूयॉर्क : 25 Sep 2015 
अमेरिका दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 'राष्ट्रध्वज संहिते'चे उल्लंघन झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री न्यूयॉर्क येथे विविध कंपन्यांच्या ४0 सीईओंसोबत स्नेहभोजन घेतले. यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध 'शेफ' विकास खन्ना यांना आपली स्वाक्षरी असलेला भारतीय राष्ट्रध्वज भेट म्हणून दिला. खन्ना हा राष्ट्रध्वज भेट म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना देणार होते. तसा मनोदयही त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केला होता. मोदींची स्वाक्षरी असलेला तिरंगाही त्यांनी सर्वांना दाखवला. त्यानंतर राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याची बाब माध्यमांत वणव्यासारखी पसरली आणि मोदींवर टीकेची झोड उठली. नियमानुसार, राष्ट्रध्वजावर कोणतेही लिखाण करता येत नाही. तसे केल्यास ते राष्ट्रध्वजाचा अवमान ठरते. अनेकांनी यात काही चूक झाली नसल्याचा दावा केला असला तरी, बहुतांश विश्लेषकांनी मोदींकडून राष्ट्रध्वज संहितेचे (फ्लॅग कोड) उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. 'काहीही लिहिण्यास तो काही हातरुमाल नाही, आपला राष्ट्रध्वज आहे', अशा संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणी सोशल माध्यमांत उमटत आहेत. दरम्यान, भारतीय अधिकार्‍यांनी खन्ना यांच्याकडून हा राष्ट्रध्वज परत घेतला आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages