मालवाहतूकदारांचा १ ऑक्टोबरपासून चक्का जाम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालवाहतूकदारांचा १ ऑक्टोबरपासून चक्का जाम

Share This
मुंबई : देशभरातील टोलनाक्याविरोधात रस्ते मालवाहतूकदारांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशभरातील टोलनाके बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील रस्ते मालवाहतूकदारांनी येत्या १ ऑक्टोबरपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
टोलनाके बंद झाले तरी टोलची रक्कम भरण्यास वाहतुकदार तयार असून सरकार सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अमृतलाल मदान यांनी केला आहे. या चक्का जाम आंदोलनामुळे देशभरातील सुमारे ७५ लाख ट्रक, अवजड वाहने ठप्प होणार आहेत. देशभरात असलेल्या टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे इंधनाचा आणि वेळेचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे मदान यांनी सांगितले. मालवाहतूकदारांनी टोल माफीची मागणी केला नाही. टोलची रक्कम सरकारला आगाऊ देण्यास मालवाहतूकदार तयार आहेत. टोलची रक्कम टोल परमीटद्वारे भरण्याची तयारी मालवाहतूकदारांनी दर्शवली आहे.मात्र केंद्र सरकारला टोलनाके बंद करायचे नसून राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध त्यात गुंतले असल्याचा आरोप मदान यांनी केला. या चक्का जाम आंदोलनानंतरही सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनेदेखील या चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. टोल नाके आणि तपासणी नाक्यांमुळे दरवर्षी ८७ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages