लोकलच्या महिला डब्ब्यात सीसीटीव्ही वेळेत सुरू व्हावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकलच्या महिला डब्ब्यात सीसीटीव्ही वेळेत सुरू व्हावे

Share This
मुंबई 14  सप्टेंबर
उपनगरीय रेल्वेच्या महिला  डब्ब्यांमध्ये सुरक्षेसाठी लावण्यात येणाऱ्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच त्या वेळेत सूरू व्हाव्यात  म्हणून पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिल कुमार सूद यांची आज भेट घेतली. ही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करा अशी मागणी यावेळी अॅड. आशिष शेलार  यांनी केली.


निर्भया फंडातून देशभरातील रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याच योजनेत मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा समावेश करून  तिन्ही उपनगरीय रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने मुंबई भेटीवर असणाऱ्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली होती. त्यावेळी या शिष्टमंडळाला दोन महिन्यात कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली होती.

दरम्यान या निर्णयानुसार रेल्वेप्रशासन सीसीटिव्ही बसविण्याची कार्यवाही करते आहे की नाही आणि ती वेळेत पूर्ण होईल की नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी आज मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिल कुमार सूद यांची भेट घेऊन याबाबतची माहिती आमदार अॅड. आशिष शेलार यांनी जाणून घेतली. याबाबत रेल्वे काम करीत असून वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे  याबाबत रेल्वेकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages