मोडकसागर नंतर तुळशी तलाव भरून वाहू लागला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोडकसागर नंतर तुळशी तलाव भरून वाहू लागला

Share This
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) -मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी बहुतेक धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गेल्या शनिवारी  मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत तर रविवारी दुपारी 3. 30 वाजता मोडकसागर तलाव भरून वाहू लागले आणि आज मंगळवारी पहाटे 5 . 30 वाजता तुळशी तलावही भरून वाहू लागले त्यामुळे मुंबईकरांची पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे. सध्या मुंबईकरांवर लागू केलेली 20 टक्के पाणी कपात टाळू शकते सध्या सातही तलावात मिळून 11 लाख 29 हजार 089 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे गेल्या वर्षी याच कालावधीत 14 लाख 34 हजार 001 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता 
                  
मुंबईतील सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरले तर उपयुक्त पाणीसाठा हा 14,47,363 दशलक्ष लिटर एवढा असतो सध्या तलावांमध्ये 11 लाख 29 हजार 089  दशलक्ष लिटर इतका पाण्याचा साठा आहे. मुंबईत दररोज 3750 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो गणपती बाप्पाच्या आगमना पासून मेघराजाने मुंबईकरांना दिलासा देण्यास सुरुवात केली तलाव क्षेत्रात समाधानकारक सुरूवात केली आणि लाखाच्यावर पाणी साठा उपलब्ध केला आणि मुंबईकरांवरचे पाणी संकट थोडे दूर केले गणपती बाप्पाने अशीच कृपा दाखवली तर मुंबईकरांवरचे पाणी संकट लवकरच दूर होईल मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर मोडकसागर तलाव भरून वाहू लागले त्यानंतर आज मंगळवारी पहाटे 5 .30 वाजता तुळशी तलावही भरून वाहू लागले तानसा आणि मध्यवैतरना तलावही भरण्याच्या मागाॅवर आहेत सध्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणी कपात लागू आहे अशीच गणपती बाप्पाने कृपा दाखवली तर  ही पाणी कपात मागे घेण्याची शक्यता असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल सध्या मोडकसागर मध्ये 128925 , तानसा मध्ये 132701 , विहार मध्ये 12852 , तुळशी मध्ये 8046 , अप्पर वैतरणा मध्ये 131205 , भातसा मध्ये 522273 , मध्य वैतरणा मध्ये 193087 पाणी साठा उपलब्ध आहे
> >
> > सध्या अशी तलाव पातळी - 22 सप्टेंबर २०१५
> >
> > तलावाचे नाव    पूर्ण पातळी      आज ची पातळी
> >
> > मोडक सागर   163 .15          163 .15
> >
> > तानसा              128 .63         127 .97
> >
> > विहार               80 .12            77 .13
> >
> > तुळशी               139 .17         139 .21
> >
> > अप्पर वैतरणा   603 .51          600 .52
> >
> > भातसा                142 .07          134 .50
> >
> > मध्य वैतरणा     285 .00            284 .75

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages