मुंबई / प्रतिनिधी / 22 Sep 2015
मुंबई महानगरने २८१ कोटी रुपयांचे दोन वर्षांचे
नालेसफाईचे कंत्राट दिले आहे. यामधील एका वर्षाचे १४० कोटी रुँपयांचे
कंत्राट आहे. पावसाल्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई होते. त्याचे ८४ कोटी
रुपये होतात. त्यापैकी १६ टक्के रक्कम कंत्राटदाराना देण्यात आले आहेत.
बाकीची रक्कम अद्याप देण्यात आलेले नाही. पालिकेने १६ कोटी रुपये दिले
असल्याने १०० कोटी रुपयांचा घोटाला झालाच नसल्याचे शेवाले यांनी सांगितले.
गाल नेणार्या २६ हजार ८०० फेर्यापैकी फ़क्त ५ गाड्या ड्युप्लिकेट आढ़ळल्या
असल्याचे शेवाले यांनी सांगितले.
मुंबई महानगर पालिकेमधे नालेसफाईच्या कामात १०० कोटी
रुपयांचा घोटाला झाल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी
केला आहे. हां आरोप चुकीचा आणि बिन बुडाचा असून हां १०० कोटी रुपयांचा
घोटाला झाल्याचे शेलार यांनी सिद्ध करावे. अन्यथा शेलार यांनी आपल्या आमदार
व् अध्यक्ष पदाचा राजिनामा द्यावा असे आव्हान खासदार राहुल शेवाले यांनी
केले आहे.
१०० कोटी रुपयांचा घोटाला झाल्याचा आरोप हां बालिश असून
बिनबुडाचा आहे. भाजपाचे आमदार आणि अध्यक्ष आशिष शेलार महानगरपालिकेची
बदनामी करत आहेत. सर्व महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आहेत.
यामुले शेलार हे मुख्यमंत्र्यांची बदनामी करत आहेत. ही बदनामी शेलार यांनी
त्वरित थांबवावी. तसेच मुख्यमंत्र्यानी याप्रकरणी लक्ष घालून शेलार यांचा
राजीनामा घ्यावा असे शेवाले म्हणाले. नालेसफाई प्रकरणात कंत्राटदारावर
कारवाई करावी अशी मागनी करताना विहायकल त्र्याकिंग सिस्टम दोषी आढळली आहे.
याला अभियंते दोषी असू शकत नाहित असे सांगत अभियंत्याना त्यांची बाजु
मांडायला न देता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन रद्द करावे अशी
मागणी पालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे शेवाले म्हणाले.
