सनातनवर बंदी घाला : काँग्रेस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सनातनवर बंदी घाला : काँग्रेस

Share This
मुंबई : कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी उजव्या विचारसरणीच्या कट्टरवादी संघटना असाव्यात, असा संशय पूर्वीपासूनच होता. पानसरे हत्याकांडात अटक झालेला पहिला संशयित सनातनचा असल्याने या संशयाला अधिक बळ मिळाले असून सरकारने या संघटनेवर तातडीने बंदी घालून दोन्ही हत्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून कट्टरवादी संघटना जणू 'आपले' सरकार आल्याच्या आविर्भावात वागत आहेत. वैचारिक विरोधाला वैयक्तिक द्वेषाचे स्वरूप देऊन हल्ले सुरू झाले आहेत. विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, असा धमकीवजा संदेश पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारवंतांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे तर कर्नाटकात एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. सदरहू विचारसरणीने प्रतिगामी विचारधारेच्या पुरस्कर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा चालवला आहे आणि या तीनही हत्या याच कारस्थानाचा एक भाग असू शकतात. या पार्श्‍वभूमीवर सरकारने तातडीने सनातन व तत्सम संघटनांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे सचिन सावंत पुढे म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages