आरक्षणाच्या फेरविचाराला दलित समाजातून विरोध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरक्षणाच्या फेरविचाराला दलित समाजातून विरोध

Share This
21 Sep 2015 - हार्दिक पटेलच्या आंदोलनामागील खरा मनुवादी चेहरा भागवतांच्या वक्तव्यामुळे समोर आला आहे. मागासवर्गीय समाज इतर समाजाच्या बरोबरीने पुढे येऊ लागल्याने काहीजणांच्या पोटात दुखु लागले आहे. त्यामुळे आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी समोर आली आहे. भारत हे  हिंदू राष्ट्र नसून सेक्‍युलर राष्ट्र आहे, या विचारसरणीला मानणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने अशी वादग्रस्त मागणी करुन दलित समाजाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे माजी मंत्री डॉ नितीन राऊत म्हणाले.

दलित व पददलित समाज इतर समाजाच्या तुलनेत विकासात मागे आहे, हा समाज जोपर्यंत इतर समाजाप्रमाणे समानतेची वागणूक मिळणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू ठेवण्याची गरज आहे. समाजातील असमानतेविरोधात आरक्षण लागू करण्यात आलेले आहे, मात्र काही जणांना त्याचा पोटशुळ उठल्याने अशी मागणी पुढे येत आहे. दलित समाज या मागणीला पूर्ण ताकदीने तीव्र विरोध करेल व आरक्षण रद्द करण्याचे सर्व प्रकार हाणून पाडेल, असे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपामध्ये जे दलित समाजाचे नेते आमदार, खासदार आहेत त्यांनी भागवतांच्या या विधानाचा निषेध करुन आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी डॉ राऊत यांनी यावेळी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages