कशा कशाचा म्हणून विचार करावा ? नुसता गोंधळ माजला आहे चारी दिशांना. एकीकडे कित्येकांच्या घरी, सोसायटीमध्ये, मित्र मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यांच्या येण्याने वातावरण मंगलमय झालं आहे. पर्जन्यराजानी आपला रुसवा सोडला आहे. बऱ्यापैकी पाउस पडल्याने पाणी टंचाईचे संकट दूर होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अशी सगळी परिस्थिती असताना देखील रोज नव्या नव्या विषयवर वाद घडताना दिसत आहेत. शिना बोरा प्रकरण सध्या चर्चेसाठी असलेल्या विषयांच्या यादीतून बाहेर पडले आहे. तूर्तास त्या विषयामुळे राकेश मारिया यांची बढती कि हकालपट्टी या चर्चेस ही विराम मिळाला आहे.त्यानंतर आता दोन विषय सध्या जास्त चर्चेत असल्याचे दिसत आहेत. कॉ गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास आणि प्रेशितांच्या जीवनावर निर्माण केला गेलेला सिनेमा.
आपण २१ व्या शतकाचे साक्षीदार आहोत. जगातील एका मोठ्या लोकशाही प्रधान देशाचे नागरिक आहोत. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालणारी ही लोकशाही व्यवस्था आहे. या देशातील न्यायव्यवस्थेचा आपण सर्वच आदर करतो यात दुमत नाही. परंतु विचारांची लढाई आपण विचाराने लढतोय का हा प्रश्न राहून राहून या देशातील सुजाण नागरिकाला नक्कीच पडत असणार. आपण देशाच्या विकासाच्या गप्पा मारतो. खरोखर विकास झालाय असं ठामपणे आपण म्हणू शकतो का ? हा प्रश्न देखील आहेच. आपण सदरा धोतरातून निघून सुटा बुटात वावरू लागलो. शेणा मातीच्या घरातून सिमेंट काँकरिट च्या घरात राहू लागलो. रस्ते, रेल्वेसेवा, विमानसेवा यांच्यात परिस्थितीनुसार बदल झाले. त्यांचा वापर हि आपण करू लागलो. तार यंत्रणा अडगळीत टाकून मोबाइल फोन,फेसबुक, व्हात्साप्प वापरू लागलो. जीवनमान उंचावलं. जीवनशैली बदलली. सर्व सुखसोयी आपल्या येत आहेत. यालाच विकास म्हणावा का ? २१ व्या शतकाकडे आपण ज्या आशा अपेक्षा ठेऊन पाहत होतो. त्या याच होत्या का ? आर्थिक सुबत्ता आली. साक्षरता देखील पूर्वीपेक्षा जास्त झाली. तरीही आपल्याकडे वैचारिक पातळीवर विकास झाला नाही. माणसांचे जीवन बदलले मात्र माणसांची मनं मात्र आपल्याकडे बदलू शकली नाहीत.
वैचारिक वाद विचारांनी लढावा आणि त्यात विजय मिळवावा अशी मानसिकता मात्र लुप्त होत चालली. आजवर आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानकडून भीती होती. दहशतवादाला खतपाणी घालून त्याने आजवर भारतीयांची अतोनात हानी केली आहे. भविष्यात ही करण्याची मनसुबे रचत आहे. त्यांनतर नक्षलवादाने देखील कित्येकांचे आयुष्य आजही वेठीस धरले आहे.हे सर्व कमी कि काय आता म्हणून मुठभर लोकं, ज्यांना आपणच आपल्या धर्माचे रक्षक आहोत असा साक्षात्कार झाला आहे. ते खुनशी मनोवृत्तीने वागू लागली आहेत. हि देशातील लोकशाहीला मारक बाब आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या आपल्या देशात अशा वादांना मुळीच तोंड फुटता कामा नये.अशी परिस्थिती निर्माण यासाठी कोणी प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. लोकशाही व्यवस्थेने दिलेले अधिकार हिसकावून घेणारे मात्र जास्त दिसत आहेत. समाजातील अनिष्ठ गोष्टींचा विरोध करत. त्यावर योग्य तो अभ्यास करून समाजाला त्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गळचेपी करण्याची आपली संस्कृती कदापि नव्हती. पण आता तशी पद्धत रूढ होऊ पहात आहे. नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांचा बळी याच पद्धतीने घेतला आहे.
दुसरीकडे काल परवापासून प्रेषित मुहम्मद पैगंबर (स) यांच्या जीवनावर येऊ आधारित जीवनपट वादाचा विषय ठरला आहे. इस्लाम धर्मियांमध्येच निर्माण झालेल्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांनी भिन्न मतं मांडली आहेत. काहीजण सिनेमाच्या विरोधात आपली मते मांडत आहेत. तो सिनेमा प्रदर्शित होऊ नये किंवा प्रदर्शित झालाच तर लोकांनी तो पाहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. काहीना तो पाहण्याची इच्छा आहे. प्रेषितांचे विचार आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. त्यांच्या जीवनशैलीची जवळून ओळख होईल अशी धारणा त्यामागे आहे. हा वाद भारतापुरता मर्यादित नाही तर जगभरातील अनेक देशात हा वाद सुरु आहे. मुस्लिमबहुल देशात तर मोठ्या प्रमाणात हा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. सामान्य जनता या वादात पडत नाही. काही मुठभर मंडळी जी त्या त्या धर्म पंथांचे स्वयंघोषित मसीहा ,रक्षक आहेत. त्यांची ही मते आहेत. जी शांततेच्या मार्गाने पटवून देण्याऐवजी अशांती माजवून लादण्याचा प्रयत्न ती करत आहेत.
२१ व्या शतकातील जीवनशैलीत सुद्धा जर मत- मतांतरे लादण्याचा प्रयत्न करत असतील तर आपला वैचारिक विकास झालाच नाही असे म्हणावे लागेल. आपण आर्थिकदृष्ट्या कितीही पुढारलेले असु पण वैचारिक पातळीवर आपलं मागासलेपण सिद्ध होत आहे. भरवा वाद विवादाचे कार्यक्रम द्या पटवून आपली मतं आपोआप आपल्या विचारांचा प्रसार होईल. एकमेकांवर कुरघोडी करणे, अंतर्गत कलह वाद करून अशांतता पसरवणे तरी टाळता येईल.एखाद्या विषयावर आपलं मत मांडणं हा गुन्हा न ठरता कौतुकाची बाब ठरेल असे वातावरण निर्माण करण्याची आज गरज आहे. जर आपण लोकशाही व्यवस्था मानतो तर लोकशाही मार्गाने संशोधन करून,चर्चा करून , कारणमीमांसा करून योग्य निष्कर्ष काढणेच आवश्यक आहे. नागरिक स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकत असतील तर त्यांना ते घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना ते करू देणे आवश्यक आहे. त्यातून आणखी चांगली पिढी घडेल. एकमेकांबद्दल मनात खदखदणारा असंतोष शांत होऊन प्रेम वाढीस लागेल. एकेमेकांच्या विचारांचा , श्रद्धांचा , धर्मांचा आदर होऊ लागेल. तपास यंत्रणा जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींचा शोध घेत असेल, त्यांची चौकशी करत असेल तर त्यांना त्यांचे काम योग्यप्रकारे करता येईल असे वातावरण निर्माण करायला हवे. त्यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात भाष्य करून किंवा पत्रकार परिषदा घेऊन वातावरण दुषित करणे टाळता आले तर बरे होईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनागोंदी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
आपण २१ व्या शतकाचे साक्षीदार आहोत. जगातील एका मोठ्या लोकशाही प्रधान देशाचे नागरिक आहोत. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालणारी ही लोकशाही व्यवस्था आहे. या देशातील न्यायव्यवस्थेचा आपण सर्वच आदर करतो यात दुमत नाही. परंतु विचारांची लढाई आपण विचाराने लढतोय का हा प्रश्न राहून राहून या देशातील सुजाण नागरिकाला नक्कीच पडत असणार. आपण देशाच्या विकासाच्या गप्पा मारतो. खरोखर विकास झालाय असं ठामपणे आपण म्हणू शकतो का ? हा प्रश्न देखील आहेच. आपण सदरा धोतरातून निघून सुटा बुटात वावरू लागलो. शेणा मातीच्या घरातून सिमेंट काँकरिट च्या घरात राहू लागलो. रस्ते, रेल्वेसेवा, विमानसेवा यांच्यात परिस्थितीनुसार बदल झाले. त्यांचा वापर हि आपण करू लागलो. तार यंत्रणा अडगळीत टाकून मोबाइल फोन,फेसबुक, व्हात्साप्प वापरू लागलो. जीवनमान उंचावलं. जीवनशैली बदलली. सर्व सुखसोयी आपल्या येत आहेत. यालाच विकास म्हणावा का ? २१ व्या शतकाकडे आपण ज्या आशा अपेक्षा ठेऊन पाहत होतो. त्या याच होत्या का ? आर्थिक सुबत्ता आली. साक्षरता देखील पूर्वीपेक्षा जास्त झाली. तरीही आपल्याकडे वैचारिक पातळीवर विकास झाला नाही. माणसांचे जीवन बदलले मात्र माणसांची मनं मात्र आपल्याकडे बदलू शकली नाहीत.
वैचारिक वाद विचारांनी लढावा आणि त्यात विजय मिळवावा अशी मानसिकता मात्र लुप्त होत चालली. आजवर आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानकडून भीती होती. दहशतवादाला खतपाणी घालून त्याने आजवर भारतीयांची अतोनात हानी केली आहे. भविष्यात ही करण्याची मनसुबे रचत आहे. त्यांनतर नक्षलवादाने देखील कित्येकांचे आयुष्य आजही वेठीस धरले आहे.हे सर्व कमी कि काय आता म्हणून मुठभर लोकं, ज्यांना आपणच आपल्या धर्माचे रक्षक आहोत असा साक्षात्कार झाला आहे. ते खुनशी मनोवृत्तीने वागू लागली आहेत. हि देशातील लोकशाहीला मारक बाब आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या आपल्या देशात अशा वादांना मुळीच तोंड फुटता कामा नये.अशी परिस्थिती निर्माण यासाठी कोणी प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. लोकशाही व्यवस्थेने दिलेले अधिकार हिसकावून घेणारे मात्र जास्त दिसत आहेत. समाजातील अनिष्ठ गोष्टींचा विरोध करत. त्यावर योग्य तो अभ्यास करून समाजाला त्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गळचेपी करण्याची आपली संस्कृती कदापि नव्हती. पण आता तशी पद्धत रूढ होऊ पहात आहे. नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांचा बळी याच पद्धतीने घेतला आहे.
समस्त मानवजात सुखी व्हावी त्यासाठी त्यांच्यासमोर सत्य यावे या विचाराने काम करणारी ही महान अहिंसक माणसं. कायम निशस्त्र राहणारी आणि अनिष्ठ बाबींवर विचारांनी प्रहार करणारी. कुणाच्याही रक्ताचा एक थेंब ही न सांडता जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारी. त्यांना जीवे मारण्यात आले.आणखी किती जणांचा खून करणार आहेत ही मंडळी ? त्यातून काय विचारांचं युद्ध जिंकता येईल का ? तपासातून पुढे आणखी काही नावे आली आहेत.त्या यादीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ,श्यामसुंदर सोन्नर यांचीही नावे आहेत अशी माहिती जगासमोर आली आहे. काय दोष यांचा व्यवसायाने पत्रकार असलेली हे माणसे प्रवचन कीर्तन करून समाजात जनजागृती करू पाहतायत. समाजातील दाहक वास्तव , कट्टर पंथीयांच्या विरोधातील आपली मते ठामपणे , बिनधास्तपणे मांडतायत हाच का यांचा दोष ? आपल्याच माणसाना असं संपवून आपण काय मोठी क्रांती करत आहोत असं कदाचित त्यांच्या मारेकर्यांना वाटत असावे पण तसं होत नाही. आणि होणार देखील नाही. निशस्त्र एकट्या व्यक्तीवर हल्ला करणे याला भ्याडपणाच म्हणतात. समोरच्याशी आमने सामने उभे राहून समान संधी दिलीत तरच तुमचा विजय होईल आणि सुज्ञ जनता तुमच्या पाठीशी उभी राहील.
२१ व्या शतकातील जीवनशैलीत सुद्धा जर मत- मतांतरे लादण्याचा प्रयत्न करत असतील तर आपला वैचारिक विकास झालाच नाही असे म्हणावे लागेल. आपण आर्थिकदृष्ट्या कितीही पुढारलेले असु पण वैचारिक पातळीवर आपलं मागासलेपण सिद्ध होत आहे. भरवा वाद विवादाचे कार्यक्रम द्या पटवून आपली मतं आपोआप आपल्या विचारांचा प्रसार होईल. एकमेकांवर कुरघोडी करणे, अंतर्गत कलह वाद करून अशांतता पसरवणे तरी टाळता येईल.एखाद्या विषयावर आपलं मत मांडणं हा गुन्हा न ठरता कौतुकाची बाब ठरेल असे वातावरण निर्माण करण्याची आज गरज आहे. जर आपण लोकशाही व्यवस्था मानतो तर लोकशाही मार्गाने संशोधन करून,चर्चा करून , कारणमीमांसा करून योग्य निष्कर्ष काढणेच आवश्यक आहे. नागरिक स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकत असतील तर त्यांना ते घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना ते करू देणे आवश्यक आहे. त्यातून आणखी चांगली पिढी घडेल. एकमेकांबद्दल मनात खदखदणारा असंतोष शांत होऊन प्रेम वाढीस लागेल. एकेमेकांच्या विचारांचा , श्रद्धांचा , धर्मांचा आदर होऊ लागेल. तपास यंत्रणा जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींचा शोध घेत असेल, त्यांची चौकशी करत असेल तर त्यांना त्यांचे काम योग्यप्रकारे करता येईल असे वातावरण निर्माण करायला हवे. त्यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात भाष्य करून किंवा पत्रकार परिषदा घेऊन वातावरण दुषित करणे टाळता आले तर बरे होईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनागोंदी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
रशिद इनामदार (९२२२५१७१४३)

No comments:
Post a Comment