मंगळवारी पालिकेच्या दादर जी/उत्तर कार्यालयावर पाण्यासाठी हंडामोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंगळवारी पालिकेच्या दादर जी/उत्तर कार्यालयावर पाण्यासाठी हंडामोर्चा

Share This

मुंबई / प्रतिनिधी - धारावीतील बहुतेक भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यासंदर्भात मनपाला जाब विचारण्यासाठी तसेच येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी वेळेवर मिळावे याकरिता मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता धोबीघाट येथून सर्व नागरिकांचा व महिलांचा प्रचंड हंडामोर्चा दादर जी/उत्तर जल विभागावर नेण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनपा जी/उत्तर जल विभागात अनेक तक्रारी आणि विनंत्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु या तक्रारीवर मनपा जल विभागाकडून आश्‍वासन देण्यापलीकडे कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने मनपाविरोधात प्रभाग क्र. १७६ मधील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सततच्या पाणीटंचाईला कंटाळून या प्रभागातील नागरिकांचे खास करून महिलावर्गाचे खूपच हाल होत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या या हंडामोर्चात प्रभाग क्र. १७६ मधील सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरिक सुविधा सेवा समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ मेढे यांनी केले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages