मुंबईत विशेष मतदार नोंदणी अभियान - 227 वार्डच राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

मुंबईत विशेष मतदार नोंदणी अभियान - 227 वार्डच राहणार

मुंबई / अजेयकुमार जाधव / 5 Oct 2015
मुंबई महानगर पालिकेच्या सन 2017 मधे होणाऱ्या निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर 8 ओक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान मतदार नोंदणी अभियान राबवले जात आहे. या अभियानात 1 जानेवारी 2016 ला 18 वर्षे पूर्ण झालेले युवक युवती आपले नाव मतदार म्हणून नोंदवू शकतात अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस श्रीनिवास यांनी पत्रकाराना दिली.

मतदार नोंदणी अभियाना दरम्यान नविन नाव नोंदवने, नाव वगळणे, दुबार मृत मतदारंची नावे वगळने, पत्ता बदलने इत्यादी कामे केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी 8 ओक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 14 ओक्टोबरला मतदार यादिचे वाचन केले जाणार आहे. या मतदार याद्याबाबत काही सूचना व हरकती असल्यास त्या मागवून 16 जानेवारी 2016 ला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुंबईमधील मतदारानी ज्याठिकाणी मतदान केले आहे अश्या एक हजार ठिकाणी मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. या अभियानासाठी जिल्हाधिकारी व निवडणुक विभागाला 2150 कर्मचारी अधिकारी पालिकेने दिले असून वेळ पडल्यास अधिक कर्मचारी देण्यात येतील अशी माहिती पालिका उपायुक्त मिलिंद सावंत यांनी दिली. मतदाराना नोंदणी सोपी व्हावी म्हणून 11 व 18 ओक्टोबर या दोन रविवारीही नोंदणीचे काम सुरु ठेवण्यात येणार आहे असे श्रीनिवास यांनी सांगितले.

विशेष मतदार नोंदणी अभियानाबाबत सामाजिक संस्थानी वस्तीपातलीवर जाऊन प्रचार करावा असे आवाहन करताना रेडिओ टिव्ही आणि वृत्तपत्र यामधून 70 लाख रुपयांच्या जाहिराती दिल्या जाणार आहेत. नागरिकांना काही तक्रारी असल्यास हेल्पलाइन नंबर 1950 वर किंवा http://ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तक्रार करावी असे आवाहन श्रीनिवास यांनी केले आहे.

227 वार्डच राहणार
-----------------
मुंबई महानगर पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार असे वृत्तपत्रातून चर्चा असतानाच कायद्यानुसार 227 नगरसेवकच राहणार आहेत. नगरसेवक किंवा वार्ड वाढ्वायाचे झाल्यास कायदा बदलावा लागेल. सध्या जी लोकसंख्या आहे त्याला 227 वार्ड मधे सामावून घ्यावे लागणार आहे. यामुले ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे अश्या शहर विभागातील नगरसेवक कमी होणार असून पश्चिम आणि पूर्व उपनगरात लोकसंख्या जास्त असल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार आहे अशी शक्यता श्रीनिवास यांनी वर्तवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS