सरकारच्या वाढदिवसासाठी जनतेच्या खिशात हात कशाला – संजय निरुपम... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

सरकारच्या वाढदिवसासाठी जनतेच्या खिशात हात कशाला – संजय निरुपम...

मुंबई 5 Oct 2015 - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये प्रतिलिटर अधिभार आकारणाऱ्या भाजपा – शिवसेना  सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल – डीझेल दर वाढी विरोधात आज सोमवार दि. ५ ऑक्टोबर, २०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता, भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर मोर्चात ७ हजाराहून अधिक संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता सामिल झाली होती...  

राज्य शासनाने नुकताच निर्णय घेऊन पेट्रोल आणि डिझेलवर दरवाढ केलेली आहे, राज्यात दुष्काळी परिस्थिती असतांना आणि सर्वसामान्य जनता भाववाढीमुळे त्रस्त झालेली असतांना पेट्रोल आणि डिझेल वरील दर वाढ सर्वसामान्यांना आणखी अडचणीत आणणारी आहे, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...


भाजपा सरकारच्या कामकाजाची पद्धत पाहिली तर ही करवाढ राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यासाठी केल्याचे दिसून येते. येणाऱ्या ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी महाराष्ट्रातील भाजपा – शिवसेना सरकारला १ वर्ष पूर्ण होणार आहे. या दिवशी आपल्या तथाकथित कामगिरीचा ढोल बडविण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणार आहे. या जाहिरातीचा खर्च भरून काढण्यास राज्य मंत्रीमंडळाने पेट्रोल आणि डिझेलवर दरवाढ केलेली आहे, असा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला... क्या अच्छे दिन आऐ ? ना महागाई गेली, पेट्रोल – डीझेल दर वाढ, रेल्वे – बस भाडे वाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाईचा भस्मासुर, एकच लक्ष विदेशी दौरे... असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

सदर भव्य बैलगाडी मोर्चात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. अशोक चव्हाण आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार असलम शेख, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, वर्षाताई गायकवाड, माजी आमदार अशोक जाधव, बाबा सिद्धिकी, चंद्रकांत हंडोरे, शाम सावंत, चरण सिंग सपरा, भूषण पाटील, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन, युथ कॉंग्रेस अध्यक्ष गणेश यादव, पक्षाचे जेष्ठ नेते, नगरसेवक / नगरसेविका, मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी, मुंबई युथ कॉंग्रेसचे पदाधिकारी, एनएसयुआयचे पदाधिकारी, सेवादलचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते...

Post Bottom Ad

JPN NEWS