मुंबईत गेल्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

मुंबईत गेल्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760 रुग्ण

मुंबई 1 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - पाऊस गेला तरी पावसात उदभवलेले विविध साथीच्या आजारांचा थैमान अजून मोठया प्रमाणात सुरूच आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे गेल्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760  रुग्ण आजाराने आढळून आले आहेत या मध्ये सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल मलेरिया आणि गॅर-टोचे आहेत या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले असून आजार रोखण्यासाठी पालिकेला अपयश आले आहे हे पालिकेच्या अहवालावरून पष्ट होत आहे 


मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु लेप्टो आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले होते मात्र आता पाऊस गेला तरी विविध साथीच्या आजारांचा नायनाट करण्यास पालिकेला अध्याप जमलेले नाही त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे.  पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे  आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्‍न करित असून ही आजार आटोक्यात येत नसल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पाऊस नसतानाही ही परिस्थिती आहे गेल्या सप्टेंबर महिन्याच्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760 रुग्ण आढळून आले आहेत या मध्ये तापाचे चक्क 12170 , मलेरिया 1045 , आणि गॅर-टो 769 रुग्णाचा समावेश आहे या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे   साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

आजाराचे नाव             आढळलेले संशयीत रुग्ण
ताप                                            12170
डेंग्यू                                            248
लेप्टो                                           26
मलेरिया                                      1045
गॅर-टो                                          769
र-वाईन प-लु                               257
टायफाईड                                    159
हेपेटीटीस                                     86

Post Bottom Ad

JPN NEWS