दाभोलकर यांची ह्त्या ब्रेनवॉश केलेल्याणीच केली
सनातनच्या आठवले कडून संमोहन शस्त्राचा गैरवापर
मुंबई / प्रतिनिधी / 1 Oct 2015
अनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची ह्त्या ब्रेनवॉश केलेल्या लोकानी केली आहे. यामुळे अश्या लोकाना पकडले तरी पोलिसाना काहीही माहिती मिळणार नाही. सनातन संस्थेची वेळीच दखल घेतली नाही. सनातनची वेळीच दखल घेतली गेली नसल्याने सतत केल्या जाणाऱ्या संमोहनाद्वारे साधकांचे ब्रेनवॉश केले जात आहे. याचे परिणाम म्हणून माणसे जिवंत रॉबट बनत आहेत. असे लोक लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्थान केल्या शिवाय राहणार नाहीत असा ईशारा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले आणि मी एका जमान्यात मित्र होतो. त्या वेळी ते फ़क्त मानसउपचार करत होते. त्या वेळी त्यांचे 1983 साली एक "क्लिनिकल हिप्नोसिस" हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकात आठवले यांनी ह्याल्युसिनेशनस, फेनोमेनो या द्वारे कश्या प्रकारे लोकाना समोहित करता येवू शकते हे लिहिले आहे. यामधेच लोकाना समोहित करून नंतर त्याना काहीही आठवणार नाही असेही करता येते असे म्हटले आहे. हे पुस्तक आठवले यानिच मला दिले आहे. या पुस्तकातील आठवले यांच्या लिखाना नुसार दाभोलकर आणि पानसरे हत्येमधे घडले आहे. पकडल्या जाणार्या समीर गायकवाड याने काहीही सांगितले नाही. गायकवाड याला त्याने काय केले हेच आठवत नसल्याने तो काय सांगणार असा प्रश्न मानव यांनी उपस्थित केला.
तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटिल व मुख्यमंत्री विलासराव देशमुख याना सनातन संस्थेबाबत माहिती देण्यात आली होती. या माहिती कड़े त्यानी दुर्लक्ष केले असले तरी शरद पवार आणि हेमंत करकरे यांनी लक्ष दिले. आजही संमोहन शास्त्राचा गैरवापर केला जात असून ब्रेनवॉश केलेले लोक तयार होत आहेत. याची वेळीच दखल न घेतल्यास महाराष्ट्राचा अफगानिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मानव यांनी दिला.
सनातनवाल्याना ईश्वरी राज्य निर्माण करावयाचे आहे. साधकांना सांगितल्या प्रमाणे त्यांच्या विरोधातील प्रत्तेक जण शैतान वाटत आसतो. समीरला पकड़ा म्हणून आदेश देणारे मुख्यमंत्रीही त्याना शैतान वाटत असावेत असे सांगुन प्रत्तेक शैतानाला मारून टाकावे असे सनातनच्या साधकाला शिकवले जाते.यामुळे सनातनच्या विरोधात बोलणारे आणि लिहिणारे सर्वानाच धोका आहे असे मानव यांनी सांगितले.
दाभोलकर हत्येचा माझ्यावर झालेल्या आरोपाच्याबाबत सनातनवर कुठलीही केस टाकणार नाही. सनातन विरोधातील विविध केसेसमध्ये माझ्याकडील माहिती समोर आणेन. मी दाभोलकर यांची ह्त्या केलेली नाही. माझ्या सस्थेला मिळालेल्या 2 कोटी रुपयापैकी 1 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाने खर्च केले आहेत. तर 1 कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. यामुले 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला व 2 कोटी रूपयासाठी दाभोलकर यांची ह्त्या केल्याचे दोन्ही आरोप मानव यांनी फ़ेटाळुन लावले आहे.
शिवसेना, आरएसएस हत्या करणार नाही
शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. तर आरएसएसची कार्यपद्धती मी स्वत: जवळून पाहिली आहे. शिवसेनेला जर एखाद्या विषयाला विरोध करायचा असेल तर ते जाहीर विरोध करतील. त्यामुळे शिवसेना-आरएसएस अशा हत्या करू शकत नाहीत, असेही मानव यांनी यावेळी स्पष्ट केले.