स्थायी समितीत विरोधकांचा गोंधळ - गोंधळातच महत्वाचा प्रस्ताव झाला मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2015

स्थायी समितीत विरोधकांचा गोंधळ - गोंधळातच महत्वाचा प्रस्ताव झाला मंजूर

मुंबई 7 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - : मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज स्थायी समितीत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सभा तहकुबी मांडली होती या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस आणि  भाजपात झालेल्या चकमकीनंतर झालेल्या गोंधळातच सभेचे कामकाज  सुरु ठेवले आणि महत्वाच्या अशा रस्ताच्या प्रस्तावाला मंजुरी देत आपला कार्यभाग साधुन घेतला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग करीत आपली नाराजी व्यक्त केली


फेरीवाल्यांच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेकर यांनी भाजपवर टीका करताना चहा विकून आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचे  वक्तव्य केल्याने भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी  आपले पंतप्रधान तर सोनियांचा पदर पकडून पंतप्रधान झाल्याचा टोला कॉंग्रेसला दिल्याने  संतप्त झालेल्या  कॉंग्रेस सदस्यांनी सदर वक्तव्य परत घेण्याची मागणी करीत गोंधळ घातला  मात्र, या गोंधळाचा  फायदा घेत यशोधर फणसे यांनी रस्त्यावरील महत्वाचा प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्याची हुशारी दाखवली. अशाप्रकारे प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल  विरोधकांनी त्याचा निषेध करीत सभात्याग केला.सध्या मुंबईत पदपथे आणि रस्ते अतिक्रमणाने व्यापलेली आहेत. अनेक फुटपाथवर आणि रस्त्यांवर उपहारगृहे, छोटे व्यावसायिक  तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी   पालिकेचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत रित्या जागा गिळंकृत केल्या आहेत. त्यात भर म्हणून अनधिकृत जागा गिळंकृत केल्या अहेत. त्यात भर म्हणून अनधिकृत फेरीवाल्यानीही रस्ते व्यापले असल्याने  नागरिक पदपथा ऐवजी  रस्त्यांवरून चालतात त्यामुळे त्यांच्या जीवालाही  धोका आहे. यामुळे वाहतूक कोंडीतही  भर पडत आहे.

या सर्वांवर कारवाई  करणे हे पालिकेचे कर्त्यव्य आहे . कारवाईसाठी  लोकप्रतिनिधींकडून सतत मागणी होत असतानाही प्रशासन याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या तहकुबीवर बोलताना मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला . पालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश असतानाही अधिकारी वर्ग त्याकडे गंभीरपणे पाहत नाही. पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी  करण्याच्या संदर्भात प्रशासनाच्या संदिग्ध भूमिकेमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडला जात आहे. त्यांच्यात संतापाची लाट पसरली असतानाही पालिका प्रशासन आणि संबंधित  अधिकारी वर्ग  जागे होत नसल्याने त्यांच्या या निष्क्रिय वृत्तीचा निषेध करण्यासाठी स्थायी समिती सभा कोणते ही कामकाज न करता तहकूब करण्यात यावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली . 

Post Bottom Ad

JPN NEWS