तीन वर्षांत पाच आयपीएस निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

31 October 2015

तीन वर्षांत पाच आयपीएस निलंबित


मुंबई : महाराष्ट्रात शासकीय सेवेत प्रमुख पदावर काम करीत असताना केलेल्या गैरकारभाराबाबत गेल्या ३ वर्षांत पाच आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे; तर ८ वर्षांत एक आयएएस अधिकारी बडतर्फ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निलंबित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरील कार्यवाही कित्येक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांची नावे जाहीर करण्यासही राज्य सरकारने नकार दिला आहे.

आपल्या पदाचा वैयक्तिक स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबन / बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र गैरकारभार केल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई झालेल्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या १० वर्षांत राज्यात आयएएस व आयपीएस कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी व त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीचे स्वरूप आणि त्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. चौकशीची कार्यवाही अद्याप सुरू असल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५च्या कलम ८(१)(ज) नुसार सद्य:स्थितीत माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS