मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांचा संकल्प
मुंबई दि. 1 आक्टोबर
मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाला असून मुंबईच्या महापौरांनी आता या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब करून असाच भ्रष्टाचार रस्ते विभागातही झाला असल्याकडे लक्ष वेधीत चौकशीची मागणी केली आहे. ज्यांनी या भ्रष्टाचाराचा गाळ उघड करण्याचे पहिले धाडस केले त्या मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आगामी काळात पालिकेतील कंत्राटदारांचे सिंडिकेट मोडून काढणार असा संकल्प जाहीर केला आहे.
मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाला असून मुंबईच्या महापौरांनी आता या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब करून असाच भ्रष्टाचार रस्ते विभागातही झाला असल्याकडे लक्ष वेधीत चौकशीची मागणी केली आहे. ज्यांनी या भ्रष्टाचाराचा गाळ उघड करण्याचे पहिले धाडस केले त्या मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आगामी काळात पालिकेतील कंत्राटदारांचे सिंडिकेट मोडून काढणार असा संकल्प जाहीर केला आहे.
मुंबईतील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामात जो भ्रष्टाचार झाला या प्रकरणी १४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ६ कंत्राटदारांच्या विरोधात एफआरआय दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून सत्तेत असतानाही मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मोठ्या धाडसाने ही चौकशीची मागणी केली आणि यातील सत्य उजेडात आले. या निमित्ताने गव्हर्नन्स नाऊ या पाक्षिकाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देत मुंबईच्या प्रश्नांवर त्यांचा असणारा अभ्यास भविष्यातील त्यांचे संकल्प आणि पक्षाची भविष्यातील प्रगती यानिमित्ताने स्पष्ट केली आहे. गव्हर्नन्स नाऊ च्या १ ऑक्टोंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या अंकात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. नालेसफाईतील दोषींवर झालेल्या कारवाईनंतर प्रथमच आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर मुलाखत दिली आहे.
शिवसेनेपासून वेगळे होऊनही भाजपाला यश मिळवणे कसे शक्य झाले, असा प्रश्न या मुलाखतीच्या निमित्ताने विचारण्यात आल्यावर त्याला उत्तर देताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, “शिवसेना हा आमचा मित्रपक्ष असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलणे चुकीचे ठरेल, काँग्रेस राष्ट्रवादी हे आमचे विरोधक आहेत. पण विधानसभा निवडणूकीच्या वेळी आमची युती तुटली तेव्हा अध्यक्ष मीच होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला प्रचंड विश्वास पाहून आम्हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे त्या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाला आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कुशल नियोजनाला जाते त्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे , सुधीर मुनगंटीवार यांच्या टीमवर्कचाही या यशात मोठा वाटा आहे, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण न होऊ देता. वेळप्रसंगी विरोधकांना अंगावर घेऊन आम्ही लढलो त्यामुळे मुंबईत आमच्या जागा वाढल्या वडाळा, मालाड (प), भांडूप, भायखळा या काही जागा आम्ही थोड्या फरकाने हरलो. नाहीतर आणखीन जागा वाढल्या असत्या”.
सध्या कोणतीही काँन्ट्रोवर्सी असली की तीथे आशिष शेलार असे सूत्र निर्माण झाले आहे. मग दहीहंडी उत्सव असो वा गणपतीउत्सवाचे प्रश्न यामागे नेमके काय? या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, “श्रेयाची लढाई भाजपाने कधीच केली नाही. सर्व मागण्या समयसूचकतेने, वेळेवर आणि अभ्यासाअंती केल्या होत्या कदाचित विरोधकांपेक्षा माझा मुंबईविषयीचा अभ्यास कांकणभर जास्त असेल त्यामुळे हे झाले असेल मात्र वाद भाजपाने सुरू केले नाहीत आम्हाला कोणी डिवचल्यास आम्ही आता गप्प बसणार नाही, काही पत्रकार मित्रांना महापालिका, विधानसभा निवडणूकीत भाजपाची ताकद वाढली हे आकडेवारीनुसार सांगितले तरी पटत नाही. पण महापालिकेच्या २२७ वॉर्डात भाजपाची स्वतंत्रपणे ताकद आहे. अर्थात आगामी महापालिका निवडणूकीच्या रणनीती बाबतचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष, मी आणि संबंधीत नेते योग्यवेळी बसून हा निर्णय घेऊ काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय होईल अशी कुठलीही परिस्थिती दिसत नाही असेही ते इथे नमूद करतात.”
मुंबई महापालिकेत सत्तेस सेना भाजपा एकत्र असून देखील नालेसफाईत १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुम्ही मित्रपक्षावर केला आहे या प्रश्नाचे त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मुळात हा आरोप मी कुठल्याही पक्षावर केलेला नाही, कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामात चांगला पैसा कमावला पालिका अधिकाऱ्यांनी त्या कामावर नीट नजर ठेवली नाही. मी स्वतः नालेसफाईचा दौरा केला त्याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित केले. कंत्राटदारांचे काम पारदर्शी नसल्याचे दिसून आले आणि म्हणूनच कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी केली. सत्ताधारी असलो तरीही मुंबईच्या जनतेला योग्य न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे असे ते नमूद करतात. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार सर्वांसमोर आणणे हे आमचे मुख्य काम आहे दुदैवाने त्यांच्या काही नेत्यांनी आरोप स्वतःवर घेतला त्यामुळे आता त्यांनीच याचे स्पष्टीकरण द्यावे.’
महापालिकेत चालणाऱ्या सिंडिकेटमध्ये आणि टक्केवारीमध्ये भाजपा नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला त्याला उत्तर देताना अॅड आशिष शेलार म्हणाले की, भाजपा शंभर ट्क्के नाही. पालिकेत कंत्राटदार आणि अधिकारी यांचे सिंडिकेट आहे काही प्रमाणात लोकप्रतिनीधी असू शकतील. अशा प्रकारचे सिंडिकेट्स एक्सपोज करण्याचे काम भाजपा करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव तसेच समन्वय समिती अशा अनेक रोखठोक प्रश्नांवर आणि मुंबईच्या विषयांवर सडेतोडपणे उत्तर देत आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिलेली ही मुलाखत येत्या आठवड्यात लक्षवेधी ठरणार आहे.
यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव तसेच समन्वय समिती अशा अनेक रोखठोक प्रश्नांवर आणि मुंबईच्या विषयांवर सडेतोडपणे उत्तर देत आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिलेली ही मुलाखत येत्या आठवड्यात लक्षवेधी ठरणार आहे.

