पेट्रोल-डिझेल दरवाढ भाववाढीला निमंत्रण देणारी - धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

पेट्रोल-डिझेल दरवाढ भाववाढीला निमंत्रण देणारी - धनंजय मुंडे


मुंबई दि.30 ................राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतीलिटर 2 रुपये भाववाढ  व विविध वस्तुंवर 5 टक्के करवाढ करण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडणारा असुन यामुळे महागाई वाढेल  , अशी भिती विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली  आहे.
“अच्छे दिनचा” आश्वासन देऊन सत्तेवर आलेले सरकार राज्य करण्यास असमर्थ असल्याच जनतेच ठाम मत झाले आहे असेही ते म्हणाले. या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरुन संघर्ष करेल असा इशाराही मुंडे यांनी दिला.


राज्य मंत्रिमंडळाने पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्याचा निर्णय हा त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. पेट्रोल-डिझेलसह विविध वस्तुंवर 5 टक्के करवाढ करण्याचा निर्णयही सर्वसामान्यांना संकटात टाकणारा आहे. दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेला या निर्णयाने फार मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारुन श्रीमंतांना करमाफी देणारे हे सरकार मोजक्या धनदांडग्यांच्या हितासाठी काम करत आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शासनाच्या या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरुन संघर्ष करेल असा इशाराही मुंडे यांनी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS