गोवंडीमधील पीडित परिवारास मुंबई कॉंग्रेस तर्फे आर्थिक सहाय्य... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

गोवंडीमधील पीडित परिवारास मुंबई कॉंग्रेस तर्फे आर्थिक सहाय्य...


काही दिवसापूर्वी गोवंडी मधील शिवाजी नगर, बैगनवाडी परिसरातील चिखलवाडी मनपा शाळा क्रमांक -३ ची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आझम अन्वर खान (वय वर्षे -१०) नावाच्या मुलाचा मृत्यू झाला, तसेच १३ मुले जखमी झाली... मयत मुलाच्या कुटुंबीयांचे सात्वन करण्यासाठी मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी (गुरुवार दि.१५ ऑक्टोबर, २१०५ रोजी दुपारी २.०० वाजता) गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी येथे भेट दिली.
  
मुंबई काँगेस तर्फे मृत मुलगा आजम अन्वर खान याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य म्हणून १ लाख रुपये देण्यात आले. तसेच मृत मुलाचे वडिल अन्वर खान यांस आमदार असलम शेख यांनी आश्वासन दिले की, तुमच्या मुलीच्या लग्नाची जवाबदारी माझी असून तिच्या लग्नाचा पूर्ण खर्च मी करेन. सदरप्रसंगी मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार असलम शेख, मुंबई काँगेस सचिव विकास तांबे, किशोर मुंडकेल, बंधु राय आणि जिल्हाध्यक्ष वेलू स्वामी नायडू उपस्थित होते...  

Post Bottom Ad

JPN NEWS