म्हाडातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती पत्र मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती पत्र मिळणार

Share This
मुंबई - 15/10/2015 :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मधील १५ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्र  प्रकाश महेता, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिले जाणार आहे.


वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी गट क  आणि ड  मध्ये प्रतिवर्षी  रिक्त होणाऱ्या पदांच्या १० टक्के इतकी मर्यादा विहित करण्यात आली आहे. त्यानुसार म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बराच काळ प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागला आहे.

अनुकंपा तत्वावरील लाभार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : वर्ग ३ अंतर्गत कनिष्ठ लिपिक ( टंकलेखक ) या पदाकरिता अंकिता उपळेकर, सुशांत कांबळे, राहुल कांबळे, महेश नांदे, योगीराज मेहेरखांब, राजेंद्र दवणे, प्रतिक देशपांडे यांना मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात नियुक्ती पत्र  दिले जाईल. तसेच वर्ग  चारमध्ये सीमा गंगावणे, बिजनादेवी  सिंग, कौतिक शिरोडकर, किरण वावरे, अमित कांबळे, विकी कोप्पुल, बिरप्पा रंगाली, प्रवीण शिंदे यांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार आहे.                 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages