देशाचा सर्वांगिण विकास साधत असताना नागरिकांनी स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष द्यावे – सुभाष देसाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2015

देशाचा सर्वांगिण विकास साधत असताना नागरिकांनी स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष द्यावे – सुभाष देसाई

मुंबई / अजेयकुमार जाधव
जगाच्या तुलनेत भारत देशही विविध क्षेत्रात प्रगती साधत आहे. अनेक बाबींत आपला देश पुढे आहे. स्वच्छता राखण्यातही आपण पुढे असावे, यासाठी मुंबईकरांनी कचऱयाचे सुयोग्य नियोजन करुन स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री  सुभाष देसाई यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ अभियांनातर्गत विभागामार्फत दिनांक २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर, २०१५ दरम्यान आयोजित स्वच्छता मोहीम पंधरवडा समारोप व ‘स्वच्छता अभियान चित्रकला व निबंध स्पर्धा २०१५-१६’ चा पारितोषिक वितरण समारंभ आज  विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, कै. नटवर्य दत्ता भट मार्ग येथे संपन्न झाला, या समारंभप्रसंगी सुभाष देसाई बोलत होते.

दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ‘स्वच्छता मोहीम पंधरवडा’ निमित्त मुंबईत भव्य अश्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील ४८० विद्यार्थ्यांना मिळून एकूण सुमारे २४ लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरुपात व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट करणाऱया महापालिका कर्मचाऱयांचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी देसाई म्हणाले की, प्रशासन त्यांचे कर्तव्य पार पाडीत असताना नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तेवढी दिसत नाही. स्वच्छता राखण्याच्या बाबतीत नागरिकांनी सुयोग्य नियोजन करावे. तेव्हाच देशाचे नाव अधिक उज्जवल होईल, असा आशावाद सुभाष देसाई यांनी अखेरीस व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS