" शिवसेना आणि भाजपला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही 'मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांचा युतीवर हल्लाबोल
मुंबई : ३० सप्टेंबर
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे जरी महापालिकेत कोणताही घोटाळा होत नसल्याचे सांगत असले तरी, महापौरांनी महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने महापौरांच्या पत्रावर आपली भुमिका स्पष्ट करावी, असे खुले आव्हान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिले आहे. तसेच महापौरांनी आता पुढचे पाऊल टाकत महापालिकेतील भ्रष्ट ठेकेदार, भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांची नावेही जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी एका पत्राद्वारे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या घोटाळ्याच्या चौकशीची प्रशासनाकडे मागणी केल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर आज जोरदार हल्ला चढवला. महापालिकेत अनिर्बंध सत्ता भोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या दीड दशकात अनेक मोठ मोठे घोटाळे केल्याचा आरोप करत मा. निरूपम म्हणाले की, नालेसफाईतील घोटाळा तर बाहेर आलाच आहे, आता रस्ते बांधणीतील घोटाळासुद्धा बाहेर येऊ द्या. कारण हा घोटाळा थोडा थोडका नव्हे तर तब्बल २५ हजार कोटींचा अाहे. या शिवाय महापालिकेच्या शिक्षण, आरोग्य या विभागांची चौकशी केल्यास आणखीही मोठे घोटाळे बाहेर येण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्तांनी त्वरित या विभागांचीही चौकशी करावी, अशी मागणीही मा. निरूपम यांनी केली. तसेच महापौरच जर सांगत असतील की आपल्या काळात घोटाळा झाला तर त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का असा सवाल करत मा. निरूपम यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महापौरांनी जे पत्र लिहीले आहे ते त्यांच्या कार्यालयात तयार झालेले नसून एका ठेकेदाराच्या कार्यालयातून या पत्राचा मसुदा तयार करण्यात आल्याचा आरोप करत हे पत्र कोणत्या ठेकेदाराच्या कार्यालयात टाईप झाले याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे ठेकेदारांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या शिवसेनेला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.
भाजपवरही केला हल्लाबोल
शिवसेनेच्या कारभाराची चीरफाड करतानाच निरूपम यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावरही जोरदार हल्ला चढवला. भाजपाही महापालिकेच्या सत्तेत सहभागी असल्याने त्यांचेही नगरसेवक या घोटाळ्यात सामिल आहेत. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दाखवणार का, असा सवाल करत भाजप नेतृत्वानेही या रस्ते घोटाळ्याबाबत आपली भुमिका स्पष्ट करण्याचे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.