महापौरांच्या लेटर बोम्बने शिवसेना अड़चणीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2015

महापौरांच्या लेटर बोम्बने शिवसेना अड़चणीत


गोपनीय पत्र उघड कसे झाले ? - चौकशीची मागणी
महापौरांच्या स्वीय सहाय्यक्कांची दोन वेळा बदली
मुंबई / अजेयकुमार जाधव / 30 Sep 2015
महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्ते विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या गोपनीय पत्राचे पडसाद आज उमटले , या पत्रावरून महापौरांचे  अभिनंदन विरोधी पक्षनेते देवेंद्र अमेरकर यांनी केले तर पत्राबाबत स्पष्टीकरण करताना स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना जोरदार कसरत लागली . त्यातच कोन्ग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी महापौरांच्या पत्राची दाखल घेऊन सत्य बाहेर आणावे असे आवाहन करीत शिवसेना भाजपला अडचणीत  केला .

महापौरांनी रस्ते विभागातील कामात भ्रश्ष्टाचार झाल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे गोपनीय पत्राद्वारे केली होती , या संदर्भात खुलासा करताना स्थायी समिती समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना मोठी कसरत करावी लागली , कारण यापूर्वी रस्ते कामाबाबत युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सभागृह नेत्या , इत्यादींनी समाधान व्यक्त केल असताना महापौरांच्या आरोपात तथ्य आहे का असे विचारले असता फणसे यांनी महापौरांनी रस्ते कामाबाबत ताक्ताक्रार केली नसून त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत आरोप केले असल्याच्या खुलासा फणसे यांनी केला.

स्थायी समिती अध्य्ख्सांवर संजय निरुपम यांनी केलेले आरोपही चुकीचेही असून नियमानुसार प्रशासनाकडून प्रस्ताव आणले जातात आणि स्थायी समितीत मंजुरी दिली जाते . मात्र त्यानंतरच्या कामाची जबाबदारी अधिकारी वर्गाची असते असा खुलासा त्यांनी केला . त्यामुळे महापौरांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले नसून काम चांगले झाले आहे यावर आताही आम्ही ठाम असल्याचे फणसे यांनी सांगितले . सदर पत्राद्वारे केलेली चौकशीची मागणी हि महापौरांची वैयक्तिक असून ती पक्षाची भूमिका नव्हती मात्र तरीही भ्रष्टाचार झाला असल्यास तो बाहेर येणे गरजेचे असल्याचे सांगत फणसे यांनी महापौरांच्या पत्राचे समर्थनही करीत कसरत केली 

गोपनीय पत्र उघड कसे झाले ? - चौकशीची मागणी महापौरांनी आयुक्तांना लिहिलेले पत्र हे गोपनीय असताना ते उघड कसे झाले . गोपनीय पत्र हा प्रशासनाचा अधिकार असून याची चौकशी करावी, अशी मागणी फणसे यांनी आयुक्तांवर संशय व्यक्त करीत केली यामध्ये चिटणीसांचाही  दोष असून चिटणी सानी मार्गदर्शन करण्याची अवश्यकत असते तरीही सदरपत्र ईग्रजी मध्ये  गेल्यामुळे महापौर खात्यातील कर्मचारी प्रियांका देसाई यांची बदली केल्याचे फणसे यांनी स्पष्ट केले . 

Post Bottom Ad

JPN NEWS