मुंबई 4 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईतील विविध विभागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंबंधात पालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यासाठी सदर उपाययोजनांचा विभागवार त्रैमासिक अहवाल आता पालिका देणार आहे अशी ठरावाची सूचना नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली आहे त्यामुळे आता नगरसेवकांना आपल्या मतदारसंघातील पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यास सोपे जाणार आहे
मुंबईत सुमारे दिडकोटी जनता राहत असून याना पाण्याची दैनंदिन गरज 4200 दशलक्ष लिटर्स इतकी असूनही 3750 दशलक्ष लिटर्स एवढाच पाणी पुरवठा उपलब्ध होत आहे त्यातूनही अंदाजे 25 टक्के पाण्याची गळती होत आहे मुंबईच्या नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होतो त्यामुळे नियमित पणे कर व जल देयकांचा भरणा करणाऱ्या नागरिकांचा रोष वेळोवेळी पालिकेला पत्करावा लागतो तसेच पाण्याच्या गळतीमुळे पालिकेस महसूलातही मोठ्या प्रमाणात तूट सहन करावी लागत आहे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने हिशोब बाहय पाण्याचे अचूक पमाण ठरविणे , पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थे मध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाणी पुरवठ्याचा अभ्यास करणे , पाण्याचा समान वाटपासाठी उपाययोजना आखणे , वितरण व्यवस्थेतील दाबाचे नियंत्रण आणि सुधारणा करणे , इत्यादी उपाययोजना अवलंबिलेल्या आहेत पालिकेच्या या उपाययोजना कोणत्या विभागामध्ये राबविण्यात येत आहेत त्याचा दृश्य परिणाम काय आहे नागरिकांना त्याचा कोणता फायदा होत आहे इत्यादी संबंधीची माहिती नगरसेवकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे ही वस्तूस्थिती लक्षात घेता पालिकेने मुंबईतील विविध विभागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंबंधात पालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यासाठी सदर उपाययोजनांचा विभागवार त्रैमासिक अहवाल पालिकेला सादर करण्यात यावा जेणेकरुन नगरसेवक आपल्या मतदारसंघातील पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करू शकतील अशी ठरावाची सूचना नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली आहे