मुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर पदावर विराजमान असलेल्या स्नेहल आंबेकर या नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे प्रसिद्धित असतात. महापौरपद मिळाल्यापासून स्नेहल आंबेकर यांनी वादग्रस्त विधाने करून स्वताला अडचणीत आणले आहे. नुकताच महापौर स्नेहल आंबेकर यांचा लेटरबॉम्ब पालिकेत फुटला आहे. या लेटरबॉम्ब मुळे पालिकेच्या मुख्यालयाबरोबर शिवसेनेचे सत्ताकेंद्र असलेले सेना भवन आणि खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेले "मातोश्री"ला हादरे बसले आहेत.
महापौरांनी दिलेले पत्र फुटल्यामुळे सर्वात जास्त भारतीय जनता पक्ष खुश झाला आहे. भाजपा शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी असला तरी भाजपाला केंद्र आणि राज्यात सत्ता आल्या नंतर पालिकेत सत्ता मिळेल अशी स्वप्ने पडू लागली आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपचा महापौर असावा हे स्वप्न पुरे करण्यासाठी शिवसेना मुख्य अडचण आहे. शिवसेनेची जितकी बदनामी होईल तितकी भाजपाला फायदा देणारी आहे. राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पाठविले आहे. यामुळे शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपाने हे पत्र फोडले असावे असाही संशय व्यक्त केला जात आहे.
महापौर नेहमी वादग्रस्त विधाने करून उत्तरे देण्याची वेळ आल्यावर मिडिया पासून लांब राहत आल्या आहेत. आताही लेटरबॉम्ब फुटल्यावर कोणताही खुलासा करावा असे महापौरांना वाटलेले नाही. या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना खुलासा करावा लागला आहे. यावेळी फणसे यांनी आमचा पक्ष भ्रष्टाचाराचे समर्थान करत नाही. महापौरांना काही अशी माहिती असेल तर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, त्याच बरोबर हे गोपनीय पत्र फुटले कसे याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
मनसे,काँग्रेस आणि भाजपाने महापौरांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करत रस्त्यामधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी हि कंत्राटे मंजूर होणाऱ्या स्थायी समितीवर हे थेट आरोप असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. पालिकेच्या नालेसफाई मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आता खुद्द महापौरांनीच रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याने रात्यातील भ्रष्टाचारही पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खणून काढावा आणि दोषी अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर जनतेकडून केली जाते आहे.
अजेयकुमार जाधव (मो. - ९९६९१९१३६३)

रस्ते कंत्राटात ८० टक्के भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपच महापौरांनी केला आहे. त्यामुळे नालेसफाईपाठोपाठ रस्ते कंत्राटातही शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे. रस्ते कंत्राटांची चौकशी करण्याची मागणी करतानाच महापौरांनी नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचेही अप्रत्यक्ष मान्य केले आहे. महापालिकेत रस्त्यांसह सर्व विकासकामांची कंत्राटे ही शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर होतात. त्यामुळे महापौरांच्या मागणीमुळे अप्रत्यक्ष स्थायी समिती अध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी ८ सप्टेंबर रोजी आयुक्त अजोय मेहता यांना गोपनीय पत्र लिहून रस्ते कंत्राटांत रस्त्यांचे रॅबिट वाहून नेण्यात भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते. डांबरी रस्त्यांचा पुन्हा विकास करताना डांबरी भाग उखडून त्यावर नवीन थर चढवला जातो. परंतु उखडलेल्या या रस्त्यांच्या रॅबिटची विल्हेवाट खासगी भूखंडावर लावली जाते. रॅबिट वाहून नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. परंतु प्रत्यक्षात केवळ २० टक्केच रॅबिटची योग्य विल्हेवाट लावली जाते.
मात्र, या ८० टक्के रॅबिटचे पैसे कंत्राटदार आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी खिशात घालतात. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट करत महापौरांनी रस्ते कामांची चौकशी करून सर्व दोषी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिका-यांविरोधात कारवाईची मागणी केली. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातून हे पत्र, अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर या पत्राचा प्रवास रस्ते प्रमुख अभियंता यांच्या कार्यालयाच्या दिशेने झाला आहे.
हे पत्र कंत्राटदाराने लिहून दिले आणि त्यावर महापौर स्नेहल आंबेकर यांनी सह्या केल्या असा आरोप लावला जात असतानाच आंबेकर यांनीच लिहिले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकारांना सांगितले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला दिलेले गोपनीय पत्र महिन्याच्या शेवटी गोपनीय न राहता फुटले आहे. हे पत्र रस्ते विभागात कार्यवाही सुरु असताना फुटले असल्याने रस्ते विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांनीच हे पत्र उघड केले असावे असा दाट संशय आहे.
महापौरांनी आपल्याच पक्षाची सत्ता असताना रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केल्याने शिवसेना अस्वस्थ झाली. महापौरांना जाबहि विचारण्यात आला. यानंतर महापौरांकडून या पत्रावर सही घेताना त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी माहिती दिली नाही असे कारण देत त्यांच्या स्वीय सहाय्यकाची एकाच दिवशी के पश्चिम व नंतर टी विभागात तडकाफडकी बदली केली आहे. या महिला सहाय्यकीला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. रस्ते विभागातून पत्र फुटले असताना महापौरांना माहिती न दिल्याचे कारण देवू या महिला कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
महापौर नेहमी वादग्रस्त विधाने करून उत्तरे देण्याची वेळ आल्यावर मिडिया पासून लांब राहत आल्या आहेत. आताही लेटरबॉम्ब फुटल्यावर कोणताही खुलासा करावा असे महापौरांना वाटलेले नाही. या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना खुलासा करावा लागला आहे. यावेळी फणसे यांनी आमचा पक्ष भ्रष्टाचाराचे समर्थान करत नाही. महापौरांना काही अशी माहिती असेल तर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, त्याच बरोबर हे गोपनीय पत्र फुटले कसे याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
मनसे,काँग्रेस आणि भाजपाने महापौरांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करत रस्त्यामधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी हि कंत्राटे मंजूर होणाऱ्या स्थायी समितीवर हे थेट आरोप असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. पालिकेच्या नालेसफाई मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आता खुद्द महापौरांनीच रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याने रात्यातील भ्रष्टाचारही पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खणून काढावा आणि दोषी अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर जनतेकडून केली जाते आहे.
अजेयकुमार जाधव (मो. - ९९६९१९१३६३)

No comments:
Post a Comment