घासवाले बाबाच्या उरसात भाविकांची गर्दी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2015

घासवाले बाबाच्या उरसात भाविकांची गर्दी


असहाय्य मुलांची ट्रस्ट  ने केली मदत 
मुंबई / १० ऑक्टोबर २०१५ / रशिद  इनामदार 
देवा भरपूर पाउस पडू दे, आमच्या वडिलांनी चूक केली ती आम्ही  करणार नाही या घोषवाक्यांनी घासवाले बाबांच्या उरसाला एक वेगळाच रंग दिला. या घोषणा देणारी मुलं  होती कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची.
त्रुंभकेश्वर राव गायकवाड यांनी त्र्यंबकेश्वर येथे स्थापन केलेल्या आधारतीर्थ आधाराश्रमाने या मुलांना आधार दिला आहे. घासवाले बाबांच्या उर्सानिमित्त दरगाह ट्रस्टने त्यांना निमंत्रित केले होते. ट्रस्ट ने त्यांची आर्थिक मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम यावेळी पार पाडला पाडला. दरवर्षी या उरसाला मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात. या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी वाढली असल्याचे दिसून आले. 

 हजरत सैय्यद गाजी सालार मलंग शाह कादरी यांचा २५ उरूस सुरु आहे. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ५० मुलांची आर्थिक मदत करण्यात आली. त्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. तसेच अन्नदान करण्यात आले.यावेळी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमाच्या अध्यक्षांसह सर्व असहाय्य मुलांचा सत्कार करण्यात आला.दरगाह ट्रस्ट चे अध्यक्ष सूफी जमाल शाह कादरी यांच्याहस्ते  पाहुण्यांचे पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे २१ जुल हिज्जा म्हणजेच ५ ऑक्टोबर गुस्ल हा धार्मिक विधी पार पडला. जवळ जवळ २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या उर्साम्ध्ये परंपरेनुसार दररोज संध्याकाळी संदल हा धार्मिक विधी केला जातो. हा उर्स १४ ऑक्टोबर पर्यंत चालेल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची असहाय्य मुले नाशिक येथील त्र्यंबकेश्वर च्या आधारतीर्थ आधाराश्रमात राहतात. येथे त्रुंभकेश्वर राव गायकवाड त्यांची काळजी घेतात. यामध्ये ३ ते १७ वयोगटातील मुले व मुली यांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS