बेटी बचाव-बेटी पढ़ाओ उपक्रमात चाईल्ड फाउंडेशन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2015

बेटी बचाव-बेटी पढ़ाओ उपक्रमात चाईल्ड फाउंडेशन


मुंबई / १०ऑक्टोबर  २०१५ / रशिद  इनामदार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलगी वाचवा, शिकवा याया उपक्रमात चाईल्ड विजन फाउंडेशनने आणखी एक अध्याय  लिहिला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने फाउंडेशन चे अध्यक्ष सुरज गेहलोत यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ३० ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या रण भूमी या हिंदी चित्रपटाच्या प्रिमियर शो चे उद्घाटन यावेळी करण्यात आले.मानखुर्दमधील महात्मा फुले शाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून हे उदघाटन  करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. 
मिळालेल्या माहितीनुसार वरळी येथील नेहरू तारांगान मध्ये रण  भूमी या चित्रपटाचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात भाजप महिला मोर्चाच्या  राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती विजया रत्नाकर,भाजप चे राज्य सचिव डॉ.राजेंद्र फडके,तरुण योगी,गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता,इंडिया न्यूज च्या चित्रा,सिने दिग्दर्शक प्रशांत सिंग राठोड उपस्थित होते .चाईल्ड विजन फौंडेशन चे अध्यक्ष सुरज गेहलोत यांनी मुलगी वाचवा, शिकवा या उपक्रमाचे कौतुक केले. यातील काही महत्वाच्या मुद्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. या सिनेमाच्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत एक चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले विद्यालयातील विद्यर्थिनिना पुरस्कारही देण्यात आले.  


Post Bottom Ad

JPN NEWS