मुंबईत ‘कॉल ड्रॉप‘चे रडगाणे सुरूच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2015

मुंबईत ‘कॉल ड्रॉप‘चे रडगाणे सुरूच


मुंबई - ‘कॉल ड्रॉप‘च्या विषयावर माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, तसेच विभागाच्या मंत्र्यांनी बैठक घेऊनही मोबाईल कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. "कॉल ड्रॉप‘च्या गुणवत्तेतील घसरता आलेख कायम राहिला आहे. एकाही मोबाईल सेवा पुरवठादाराला "कॉल ड्रॉप‘बाबत अपेक्षित निकष पाळण्यात मुंबईत यश आलेले नाही. दिल्लीत अजूनही तीन ऑपरेटरच्या सेवेत सुधारणा झालेली नाही. मुंबई आणि दिल्लीतील "कॉल ड्रॉप‘विषयीचा अहवाल शुक्रवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जाहीर केला.
मोबाईल कॉल किंवा डेटासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी कव्हरेजची टक्केवारी घटलेली आढळली. कॉलच्या गुणवत्तेबाबतही अवघ्या एका कंपनीला निकषांची पूर्तता करण्यात यश आले. मुंबई आणि दिल्लीतील मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्टची माहिती "ट्राय‘ने शुक्रवारी जाहीर केली. मुंबई आणि दिल्लीत वाढत्या "कॉल ड्रॉप‘च्या मुद्द्यावर या चाचण्या करण्यात आल्या.

जून व जुलैमध्ये मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कबाबत चाचणी झाली होती. त्यानंतर ट्रायने दूरसंचार सेवा पुरवठादारांची बैठक घेतली होती. पण या बैठकीनंतरही मोबाईल नेटवर्कमध्ये काहीच विशेष सुधारणा झालेली नाही. रेडिओ फ्रिक्वेन्सी कव्हरेज, कॉल सेटअप सक्‍सेस रेट, कॉल ड्रॉप रेट आणि आवाजाची गुणवत्ता असे निकष चाचणीसाठी होते. त्यानुसार मोबाईल कंपन्यांच्या सेवेत कोणतीही प्रगती झाली नसल्याचा ट्रायचा अहवाल आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS