रिपाइंचे आज बीड मध्ये शक्तिप्रदर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2015

रिपाइंचे आज बीड मध्ये शक्तिप्रदर्शन


मुंबई - 2 ओक्टोबर 2015
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया या पक्षाचा58वा स्थापना दिन सोहळा उद्या दि3 ऑक्टोम्बर रोजी बीड मधील सर्कस मैदान येथे आयोजित केला आहे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या रिपाइं च्या 58 व्या स्थापना सोहळ्यात राज्यभरातील रिपाइंचे भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन घडवीणार आहेत 


रिपाइंच्या या कार्यक्रमास भाजप चे प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब दानवे शिवसेनेचे नेतेपर्यावरण मंत्री रामदास कदम बीड च्या पालकमंत्री पंकजा ताई मुंडे रासप आमदार महादेव जानकर शिवसंग्राम नेते आमदार विनायक मेटे तसेच रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर अविनाश महातेकरगौतम सोनवणे गौतम भालेराव तानसेन ननावरे  बाबुराव कदम राजा सरवदे पप्पू कागदे रमेश मकासरे  आदि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत

डॉ बाबासाहेब अम्बेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना त्यांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोम्बर 1957 रोजी करण्यात आली रिपब्लिकन चळवळीत रिपाइं स्थापनादिन गेल्या अनेक वर्षांपासून खासदार रामदास आठवले राज्यस्तरीय कार्यक्रम घेवून साजरा करीत आहेतबीड मध्ये आयोजित केलेल्या रिपाइं स्थापना  सोहळ्यातशक्तिप्रदर्शन घडविन्यात येणार आहे

रिपाइंला सत्तेत कोणताही वाटा मिळाला नसला तरी रिपइंने दिल्लीत तालकटोरा स्टेडियम मध्ये आयोजित केलेला 125व्या भीम जयंतीचा कार्यक्रम तसेच मुंबईत बांद्रा कुर्ला संकुल मैदानात झालेले अधिवेशनात रिपाइंने पक्षाची ताकद दाखविली होती आता उद्या बीड मध्ये मित्र पक्षांसमोर तथा मुख्यमंत्र्यांसामोर रिपाइंचे58व्या वर्धापन सोहळ्यात शक्तिप्रदर्शन दिसणार आहे या सोहळ्यास मोठ्या संख़्येने सामील होण्याचे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS