पुरातन वस्तूंच्या जतन व सौदर्यीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2015

पुरातन वस्तूंच्या जतन व सौदर्यीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी


मुंबई 6 Oct 2015 (प्रतिनिधी): मुंबईतील विकासात्मक,सामाजिक व जतन करावयाची  सौदर्यात्मक कामे पार पाडण्यासाठी तज्ञ मंडळी व नागरिक यांच्याकडून आलेल्या सुचेनांची अंमलबजावणी कण्यात यावी आणि त्याकरिता पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी ठरावाची  सूचना शिवसेना नगरसेवक अवकाश जाधव यांनी केली आहे. 

महापालिका अधिकारांचे  विकेंद्रीकरण होवूनही पालिकेची अनेक महत्त्वाची धोरणे नागरिकांच्या सहभाग शिवाय आखण्यात येत असल्यामुळे मुंबई शहराच्या विकासात्मक, सामाजिक व जतन करावयाच्या सौदर्यात्मक बाबींवर परिणाम होत आहे. किंबहुना नागरिकांच्या गरजेचा व सामाजिक परिणामाचा सखोल विचार न करता घेतलेले निर्णय बदलण्याची नामुष्की पालिकेवर ओढवलेली आहे.

सामाजिक, विकासात्मक कामे तसेच तिवरांची कत्तल रोखण्यासाठी  विशेष पथक स्थापन करणे, शहराचे कला व सांस्कृतिक महत्त्व वाढविण्यासाठी कला दालनाची स्थापना करणे, मंडपेश्वर व महाकाली गुफा तसेच गिल्बर्ट हिल येथील वस्तूचे जतन व सौदर्यीकरण करणे, मुंबई सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणे, इत्यादीसाठी शहरातील तज्ञ मंडळी व नागरिक यांचा सहभाग वाढविणे आणि त्यांच्या योग्य सूचनेनुसार अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याने मुंबई शहरातील विकासात्मक सामाजिक व जतन करावयाची सौदर्यात्मक कामे पार पडण्यासाठी तज्ञ मंडळी व नागरिक यांच्याकडून  आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि यासाठी पालिकेच्या  अर्थसंकल्पात तरतूद करावी जेणेकरून मुंबईच्या विकासात लोकांचा सहभाग वाढीस लागू शकतो असे अवकाश जाधव यांनी म्हंटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS