कचऱ्याने तुबंलेले नाले त्वरित साफ करण्यासाठी पयाॅयी व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2015

कचऱ्याने तुबंलेले नाले त्वरित साफ करण्यासाठी पयाॅयी व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी


मुंबई 6 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - नालेसफाई कामात भ्रष्टाचार झाल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईचे कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पावसाळ्या नंतरची  नालेसफाईची कामे ठप्प झाली आहेत. यामुळे मुंबईत  अनेक नाले पूर्णपणे भरले असून सदर नालेसाफ करण्यासाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांना भेटून केली. 
                   
मुंबईतील नालेसफाईची  कामे देताना पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि पावसाळ्यानंतर २० टक्के अशी वर्गवारी करून देण्यात येतात. यावर्षी दोन वर्षासाठी १८४ कोटी रुपयांचे कंत्राट दिले  गेले होते. मात्र नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप कॉंग्रेस, भाजपाकडून  झाल्यानंतर आयुक्तांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या चौकशी समितीच्या अहवाल नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्याने पालिकेच्य चार अभियंत्यावर कारवाई करण्यात आली तर कंत्राटदारांना जबाबदार धरीत आयुक्तांनी संपूर्ण कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईतील सर्व नाल्यांची सफाईची कामे थांबली असल्याने मुंबईत अनेक थाक्नी नाले भरल्याचे चित्र समोर आले आहे. या बाबतच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी फणसे यांचाय्साय आयुक्तांची भेट घेवून सदर वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडून याबाबत त्वरित निर्णय घेण्याच्या सूचन केल्या. भ्रष्टाचार करण्यारांवर कारवाई झालीच पाहिजे परंतु नाल्यातील गाळ काढणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने यासाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचन आपण आयुक्तांना दिला असून त्यांनीही याबाबत त्वरित कार्यवाही कण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती फणसे यांनी दिली.

ई- टेन्डरिंग कामाच्या चौकशीची मागणी  नगरसेवक फंडातून विभागातील स्थापत्ये कामे करताना कामाचा दर्जा चांगला नसल्याने मुंबईतील सर्वच नगरसेवकांच्या विभागातील कामांची तपासणी करा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांकडे केली आहे. ई- टेन्डरिंगद्वारे कंत्राटदार निविदा भरताना अनामत रक्कम कमी असल्याने कामाच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत. याबाबत त्यांना जाब विचारला असता ते काम अर्धवट टाकून गायब होतात. आमचा  ई- टेन्डरिंगला विरोध नाही मात्र कामाचा दर्जा चांगला नसल्याने आणि वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे फणसे यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS