वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे हीच खरी देशभक्ती – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे हीच खरी देशभक्ती – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

5 Oct 2015
आज मानव सेल्फी काढता काढता प्रचंड सेल्फीश झाला आहे. या स्वार्थी प्रवृत्तीमुळे  वनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तिसरे विश्वयुध्द जर पाण्यासाठी होणार असेल तर चौथे विश्वयुध्द प्राणवायुसाठी होईल. आपल्याला प्राणवायू विकत घ्यावा लागेल हि वेळ फार दुर नाही.  देश टिकवायचा असेल तर झाडे लावावी लागतील. वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे हीच खरी देशभक्ती आहे असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. 05 ऑक्टोबर रोजी दैनिक लोकसत्ता द्वारे मुंबईत आयोजित पर्यावरण परीषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. वनांची कथा आणि जंगलाची व्यथा या विषयावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले प्रत्येक धर्मात वनांचे विशेष महत्व आहे. वन्यजीव आणि वने यांचे संवर्धन व संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी आम्ही योग्य पध्दतीने पार पाडीत नाही हि वस्तुस्थिती आहे. लोकसहभागातून वनसंरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आम्ही  स्थापन केल्यात.सॅटेलाईट सर्व्हेलन्स आणि रिमोट सेन्सिंग चा उपयोग करत वृक्ष तोडीवर प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वन परिसरात अवैध कारवाया थांबविण्याच्या दृष्टीने आम्ही तंत्राचा वापर करणार आहोत. वनविभाग हा उत्पन्न देणारा विभाग आहे. वनउपज व वन औषधींची विक्री करण्यासाठी वन धन जन धन या विक्री केंद्राचा उपक्रम आम्ही सुरू केला. पहिल्याच दिवशी 36000 रुपयांची विक्री या केंद्राच्या माध्यमातून झाली. हा उपक्रम राज्यभर राबविण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही सुरू केली आहे. हरित गावे हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. हरित महाराष्ट्र हे माझे स्वप्न आहे. यासाठी ग्रीन आर्मी आम्ही निर्माण करीत आहोत. सामाजिक वनीकरण विभाग आम्ही वनविभागाकडे वर्ग केला. वनसंरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनेसुध्दा आम्ही अनेक उपाययोजना आखल्या आहेत. महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर अधोरेखित व्हावे म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना व्याघ्र दूत म्हणून योगदान देण्याची  विनंती आम्ही केली व त्यांनी ती स्विकारली. तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. वनेतर जमिनींवर वने वाढविण्याचा कार्यक्रम येत्या काळात आम्ही राबविणार आहोत असेही  यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS