शांतता पुरस्कार गाव व तालुका पातळीवरही द्यावा - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

शांतता पुरस्कार गाव व तालुका पातळीवरही द्यावा - राज्यपाल

मुंबई, दि. 5 : कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा महात्मा गांधी शांतता पुरस्कार गाव आणि तालुका पातळीवरील व्यक्तींनाही देण्यात यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे महात्मा गांधी शांतता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान  व्यासपीठावर उपस्थित होते .
    
यावेळी शांतता व जातीय सलोखा कायम ठेवण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील व्यक्तींना महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे : अतुलचंद्र कुलकर्णी, सह पोलिस आयुक्त, मुंबई, देवेन भारती, सह पोलिस आयुक्त, मुंबई, बिपीन कुमार सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक (तुरुंग), लक्ष्मी नारायण, सह पोलिस आयुक्त, ठाणे, श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी, जळगाव, विरेश प्रभु, पोलिस अधिक्षक, सोलापूर, डॉ. जालींदर सुपेकर, पोलिस अधिक्षक, जळगाव, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधिक्षक, लातूर, विरेंद्र मिश्र, पोलिस उपायुक्त, परिमंडळ, 10, मुंबई, संजय पाटील, पोलिस उपायुक्त, पुणे, अखिलेश कुमार सिंग, पोलिस अधिक्षक, यवतमाळ, सुनिल खडासने, अपर पोलिस अधिक्षक, मालेगाव, राजेंद्र शंकर रायसिंग, पोलिस उपअधिक्षक, नंदूरबार, बळीराम रखमाजी गिते, पोलिस निरिक्षक, बुलढाणा, डॉ. श्रीमती निशिगंधा वाड, मुंबई, डॉ. ए. आर. उंदरे, रायगड, मोईब अली नासीर, मुंबई, पाटणकर, मुंबई

Post Bottom Ad

JPN NEWS