शिवसेनेपुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नतमस्तक – संजय निरुपम... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2015

शिवसेनेपुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नतमस्तक – संजय निरुपम...


मुंबई / प्रतिनिधी / ८ ओक्टोंबर २०१५ 
शिवसेनेच्या दंडेलीमुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द केल्यामुळे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आश्चर्य व्यक्त करून जाहिर निषेध केला आहे. 


ही गोष्ट खरी आहे कीसीमेवर पाकिस्तानकडून कुरपताखोरी चालू आहेआपले सैनिक शहीद होत आहेतवारंवार पाकिस्तानी सेनेच्या गोलीबारीमुळे सीमेवरील गावातील नागरिकांचे जगणेच मुश्कील झाले आहे. साफ साफ दिसते आहे कीकेंद्र सरकारने पाकिस्तानपुढे गुडघे  टेकले आहेत्याचप्रमाणे शिवसेनेपुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हतबल झाले आहेततरीही प्रश्न आहे कीपाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून पाकिस्तान सुधारणार का याचे उत्तर शिवसेनेने द्यावे,  असे निरुपम म्हणाले.

चिंतेची बाब म्हणजेगुलाम अली यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही आहेम्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीही नंतर आयोजकांनी शिवसेनेच्या गुंडागर्दी समोर हार पत्करून आपला कार्यक्रम रद्द केला. शिवसेनेपुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नतमस्तक झाले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेतअसे निरुपम म्हणाले.

जसे पाकिस्तानपुढे मोदी सरकार नपुंसक झाली आहेतसेच शिवसेनेपुढे महाराष्ट्र सरकार नपुंसकासारखा व्यवहार करताना दिसत आहेअसे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध म्हणजे देशभक्ती नसून सोयीचे राजकारण आहेकारण शिवसेना सद्या महानगर पालिकेत हजारो कोटींच्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेली आहेमुंबईतील जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचा विरोध करीत आहेशिवसेनेला दाऊद अब्राहीम यांचे सोयरे जावेद मियाँदाद यांचा  मातोश्रीवर सत्कार केलेला चालतो परंतु गुलाम अली चालत नाहीअसे निरुपम यांनी सांगितले. 

भारताचे सुप्रसिद्ध गझल गायक स्व.जगजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलेपरंतु शिवसेनेचे सोयीचे राजकारण एवढे भारी आहे कीगुलाम अली यांचा विरोध करीत स्व.जगजीत सिंह यांचा सुद्धा अपमान केलेला आहेअसे निरुपम म्हणाले...

Post Bottom Ad

JPN NEWS