स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत तीन वस्ती शौचालयांचे लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत तीन वस्ती शौचालयांचे लोकार्पण

Share This

MUMBAI 8 Oct 2015 
स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने वस्ती स्वच्छता कार्यक्रमाद्वारे झोपडपट्टयांमध्ये मानखुर्द, एम/पूर्व विभाग येथील मातंग ऋषीनगर, गावदेवी, घाटकोपर येथील अरुणोदय मित्र मंडळ तसेच घाटकोपर भटवाडी राजेंद्र कडलक ट्रस्ट या तीन ठिकाणी बांधण्यात आलेल्या वस्ती शौचालयांचा लोकार्पण सोहळा स्थानिक नगरसेवक व स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत पार पडला.   

सदर ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून पाणी व विद्युतपुरवठा इत्यादी सर्व सुविधांयुक्त एकूण १८ नवीन शौचकुपांचे हस्तांतरण करण्यात आले. सदर वस्ती शौचालयांची दैनंदिन स्वच्छता व व्यवस्थापन शौचालयांचा वापर करणारे रहिवाशी व त्यांच्या संस्था लोकसहभागातून करणार आहेत, हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. एम/पूर्व विभागातील झोपडपट्टीवासियांची मोठी संख्या लक्षात घेता डॉ. झाकिर हुसेन नगर, गोवंडी आणि बैंगनवाडी मार्ग क्रमांक १३, आदर्श नगर या दोन वस्त्यांमध्ये स्थानिक नगरसेवक व रहिवाशांच्या उपस्थितीत एकूण ७६ शौचकुपांच्या वस्ती शौचालयांच्या बांधकामाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे स्थानिक रहिवाशी व नगरसेवकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages